ChaturGrahi Yoga 2026: ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक महिन्यामध्ये काही ग्रहांचे राशी परिवर्तन, नक्षत्र परिवर्तन होते. ज्याचा प्रभाव १२ राशींवर पडतो. सध्या मकर राशीत शुक्र, सूर्य, बुध आणि मंगळ ग्रह एकत्र विराजमान असून या चतुर्ग्रही योगाचा शुभ प्रभाव नक्कीच १२ पैकी राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. पंचांगानुसार, या चार ग्रहांचे नक्षत्र गोचर नक्कीच १२ पैकी काही राशींसाठी लाभदायक सिद्ध होईल. १३ जानेवारी २०२६ रोजी मकर राशीत शुक्र ग्रहाचा प्रवेश केला असून १४ जानेवारी २०२६ रोजी सूर्याने देखील याच राशीत प्रवेश केला तसेच १६ जानेवारी रोजी मंगळाने देखील मकर राशीत प्रवेश केला व १७ जानेवारी रोजी या राशीत बुध ग्रहाचा प्रवेश झाला. त्यामुळे मकर राशीच चार ग्रहांची महायुती निर्माण झाली.

चतुर्ग्रही योगाचा शुभ प्रभाव या राशींवर पडणार

सिंह (Singh Rashi)

सिंह राशींच्या व्यक्तींसाठीही चतुर्ग्रही योग खूप खास असणार आहे. या काळात तुम्हाला अनेक सुख, सुविधा प्राप्त होतील. अचानक धनलाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. नोकरी, व्यवसायामध्ये यश मिळेल; तसेच गुंतवणूक करणेही फायदेशीर ठरेल. या काळात तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. दूरचे प्रवासही घडतील.

कन्या (Kanya Rashi)

कन्या राशींच्या व्यक्तींसाठी देखील हा चतुर्ग्रही योग खूप उत्तम सिद्ध होईल. या काळात तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणींवर मात होईल. शुभ ग्रहाच्या युतीमुळे मिथुन राशीच्या व्यक्तींना नोकरी, व्यवसाय यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठीदेखील हा काळ उत्तम आहे. कुटुंबातील जुने वाद मिटतील; ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवनदेखील सुखमय असेल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल.

वृषभ (Vrushabh Rashi)

चतुर्ग्रही योग वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप खास असणार आहे. या काळात या राशीच्या व्यक्तींना भाग्याची पूर्ण साथ मिळेल. त्यांची अडकलेली कामे पूर्ण होतील. नवीन नोकरी मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. या काळात तुमचे आरोग्यही उत्तम राहील. प्रेमसंबंध सुखमय होतील आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील.

मेष (Mesh Rashi)

मेष राशींच्या व्यक्तींसाठी देखील हा चतुर्ग्रही योग अनुकूल सिद्ध होणार आहे, आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)