Shukra Chandra Sam Saptak Yog 2026 : वैदिक ज्योतिषशास्त्रात चंद्र आणि शुक्र हे दोन्ही अत्यंत शुभ ग्रह मानले जातात. हे दोन्ही ग्रह २८ सप्टेंबरच्या सकाळी समसप्तक योग तयार करतील. चंद्र २८ सप्टेंबरच्या सकाळी मीन राशीतून निघून मेष राशीत प्रवेश करील आणि तूळ राशीत असलेल्या शुक्रासह समसप्तक योग तयार करील. या योगामुळे काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात अत्यंत शुभ परिणाम पाहायला मिळतील.

मिथुन

समसप्तक योगादरम्यान मिथुन राशीच्या लोकांना शुभ फळ मिळेल. मिथुन राशीच्या काही लोकांना अचानक धनलाभाची संधी मिळू शकते. तसेच उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. आर्थिक गुंतवणुकीतून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. करिअरच्या क्षेत्रात पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. विद्यार्थ्यांची अभ्यासातील एकाग्रता वाढेल.

कर्क

समसप्तक योगामुळे कर्क राशीच्या लोकांच्या भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. काही लोक नवीन घर किंवा वाहन खरेदी करू शकतात. नोकरदार व्यक्तींच्या पगारात वाढ झाल्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना नशिबाची साथ मिळून उत्तम नोकरी मिळू शकते. आई-वडिलांसह आनंदी वेळ घालवण्याची संधी मिळेल.

तूळ

शुक्र आणि चंद्राच्या समसप्तक योगामुळे तूळ राशीच्या लोकांच्या कौटुंबिक आणि वैवाहिक आयुष्यात सकारात्मक बदल दिसून येतील. नवविवाहित जोडप्यांच्या आयुष्यात नवीन पाहुण्याचे आगमन होऊ शकते. व्यापाऱ्यांना मनासारखा व्यवहार झाल्याने मोठा आर्थिक फायदा होईल. भूतकाळात केलेल्या गुंतवणुकीतूनही चांगला परतावा मिळू शकतो. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. तसेच तुमच्या आरोग्यातही सुधारणा झाल्याचे पाहायला मिळेल.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)