Premium

पुढील महिन्याच्या सुरुवातीला ‘या’ राशींचे अच्छे दिन सुरु? शुक्र कन्या राशीत प्रवेश करताच मिळू शकतो गडगंज पैसा

शुक्र राशी परिवर्तन करताच अनेक राशींच्या संपत्तीत वाढ होऊ शकते.

Shukra Gochar 2023
शुक्र राशी परिवर्तन. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

शुक्र ग्रह ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करत असतो. शुक्र हा प्रेम आणि आकर्षणाचा कारक मानला जातो. शुक्राच्या राशी परिवर्तनाचा प्रत्येक राशीच्या जीवनावर काही ना काही प्रभाव पडतो. ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र २ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १२ वाजून ४३ मिनिटांनी सूर्याच्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे. तर तो ३ नोव्हेंबरपर्यंत याच राशीत राहणार आहे. त्यानंतर तो कन्या राशीत प्रवेश करेल. शुक्र सिंह राशीत असल्यामुळे अनेक राशींच्या पद, प्रतिष्ठा आणि संपत्तीत वाढ होऊ शकते. शुक्राचा सिंह राशीत प्रवेश कोणत्या राशींना फायदेशीर ठरु शकतो ते जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेष रास

मेष राशीच्या पाचव्या स्थानी शुक्र प्रवेश करणार आहे. जे या राशीच्या लोकांसाठी ते अनुकूल ठरु शकते. या काळात तुम्ही कुटुंबाबरोबर वेळ घालवू शकता. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील, परंतु खर्चही वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. जे तुम्ही चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याचा प्रयत्न करु शकता. व्यवसायातही नशीब तुमची साथ देऊ शकते, कामानिमित्त तुम्हाला लांबचा प्रवास घडू शकतो.

वृषभ रास

या राशीच्या लोकांना शुक्र गोचरचे सकारात्मक परिणाम होऊ शकतात. जर तुम्हाला वाहन खरेदी करायचे असेल तर तुम्ही ते या कालावधीत खरेदी करू शकता. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. व्यवसायातही तुम्हाला लाभ होऊ शकतो. तसेच तुम्ही कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकता. वैवाहिक जीवनातही तुम्हाला आनंद मिळू शकतो. संपत्ती वाढल्याने समाजात मान-सन्मान वाढू शकतो.

हेही वाचा- पुढच्या आठवड्यात ‘या’ राशींचे लोक बक्कळ पैसा कमावणार? टॅरो कार्डनुसार तुम्हाला काय फायदा होऊ शकतो जाणून घ्या

सिंह रास

सिंह राशीत शुक्राचे गोचर होत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. वडिलोपार्जित मालमत्तेतून पैसा कमावण्याची संधी मिळू शकते. या काळात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. काही लोकांना या काळात परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. नोकरदारांची त्यांच्या वरिष्ठांकडून प्रशंसा होऊ शकते आणि चांगल्या कामगिरीच्या आधारे तुमचे प्रमोशन होऊ शकते. व्यवसायात यश मिळून तुम्हाला आर्थिक लाभही मिळू शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shukra gochar 2023 good days of this rashi start at the beginning of next month huge money can be obtained as soon as venus enters the virgo sign jap

First published on: 24-09-2023 at 17:52 IST
Next Story
३० ऑक्टोबरपासून सिंहसह ‘या’ राशींना मिळेल अपार धन? राहू अन् गुरुची अशुभ युती संपल्याने येऊ शकतात सुखाचे दिवस