Premium

४८ तासात ‘या’ राशींना होणार आर्थिक लाभ? सुखदाता शुक्रदेव राशी परिवर्तन करताच मिळू शकते नशिबाला कलाटणी

Shukra Gochar 2023: सुखदाता शुक्रदेव तूळ राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे काही राशींना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

Shukra Gochar 2023
सोन्यासारखे चमकेल 'या' राशींचे नशीब? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Shukra Gochar 2023: २०२३ हे वर्ष संपण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, ३० नोव्हेंबरला रात्री १२ वाजून ५ मिनिटांनी सुखदाता शुक्रदेव तूळ राशीत प्रवेश करणार आहेत. २५ डिसेंबरपर्यंत ते याच राशीत विराजमान असणार आहेत. चला जाणून घेऊया तूळ राशीत शुक्रदेवाने प्रवेश केल्याने कोणत्या राशींना सुख, समृध्दी आणि अपार धन लाभण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘या’ राशींना शुक्रदेव देणार प्रचंड पैसा?

मेष राशी

भौतिक सुखांचा स्वामी शुक्रदेवाच्या राशी परिवर्तनाने मेष राशींच्या लोकांच्या विलासात वाढ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना या काळात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमचे अपेक्षित यश मिळवू शकाल आणि तुमच्या सुखसोयी वाढण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांना प्रगतीच्या नवीन संधी मिळू शकतात.

(हे ही वाचा: आजपासून बुधदेव ‘या’ राशींना देणार अपार धन? बुधदेवाच्या गोचरामुळे २०२४ सुरु होण्याआधीच होऊ शकता श्रीमंत )

कर्क राशी

कर्क राशीच्या लोकांना शुक्रदेवाच्या कृपेने मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी गोचर कालावधी लाभदायी ठरु शकते. नोकरदार वर्गाला करिअरमध्ये नवनव्या संधी मिळू शकतात. तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्हाला नवीन स्रोत मिळू शकतात. त्याचबरोबर अडकलेले पैसे परत मिळू शकतात. समाजात मानसन्मान वाढू शकतो.

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांना शुक्रदेवाच्या राशी परिवर्तनाने एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. नशिबाची उत्तम साथ मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना अपेक्षित लाभ मिळू शकते. आर्थिक मिळकतीचे मार्ग वाढू शकतात. तुम्हाला भरपूर पैसे मिळू शकतात. या राशीच्या लोकांची करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. जोडिदाराकडून मोठं सरप्राइज देखिल मिळू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shukra gochar 2023 venus transit in tula these three zodiac signs bank balance to raise money pdb

First published on: 28-11-2023 at 11:24 IST
Next Story
Rashifal 2024 : कर्क, सिंह आणि कन्या राशीच्या व्यक्तींसाठी कसे असेल २०२४ वर्ष? कोणाला मिळेल नशिबाची साथ जाणून घ्या…