Navpancham Rajyog 2024 : ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रहांपैकी एक शुक्र हा ग्रह सुख-संपत्ती, ऐश्वर्य-वैभव अन् प्रेमाचा कारक मानला जातो. त्यामुळे शुक्राच्या राशीतील बदलाचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या होत असतो. अरुण हा खूप महत्त्वाचा ग्रह मानला जातो; ज्याला युरेनस, असेही म्हणतात. हा सूर्यमालेतील तिसरा सर्वांत मोठा ग्रह मानला जातो. अशा परिस्थितीत अरुण ग्रहाच्या स्थितीतील बदलामुळेही १२ राशींच्या लोकांच्या जीवनावर परिणाम होतो. यावेळी अरुण ग्रह वृषभ राशीमध्ये स्थित आहे; जो शुक्राबरोबर नवपंचम राजयोग तयार करणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे या तीन राशींना मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो. तसेच, त्यांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदू शकते.

ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून १२० अंशांवर एकाच अंशावर म्हणजेच पाचव्या आणि नवव्या स्थानावर असतात तेव्हा नवपंचम योग तयार होतो. ज्योतिषशास्त्रात हा योग अत्यंत शुभ मानला जातो. २ डिसेंबरच्या दिवशी रात्री ८ वाजून १० मिनिटांनी शुक्र आणि अरुण एकमेकांपासून १२० अंशावर असतील. अशा परिस्थितीत नवपंचम राजयोग तयार होत आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…

डिसेंबरमध्ये नवपंचम योगामुळे ‘या’ राशी होणार मालामाल

मीन

शुक्र आणि अरुण ग्रहामुळे निर्माण होणारा नवपंचम राजयोग मीन राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर सिद्ध होऊ शकतो. या राशीच्या लोकांना अनपेक्षितपणे आर्थिक लाभ होऊ शकतो. त्यासह वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचीही शक्यता आहे. करिअरच्या क्षेत्रात पदोन्नतीसह प्रोत्साहन मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यावर तुम्ही समाधानी दिसत आहात. व्यवसायाच्या क्षेत्रातील लोकांना त्यांनी आखलेला प्लॅन यशस्वीरीत्या राबवता येऊ शकतो आणि त्यातून त्यांना भरपूर नफा कमवता येऊ शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहील आणि पैशांचीही बचत करता येईल.

कुंभ

कुंभ या राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि युरेनस खूप फायदेशीर सिद्ध होऊ शकतात. तुमचा अध्यात्माकडे अधिक कल असेल. त्यासोबत तुम्ही धार्मिक सहलीला जाऊ शकता. कामानिमित्त परदेशात जाण्याचीही संधी मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. लव्ह लाईफबद्दल बोलताना विनाकारण रागावणे टाळा.

शनिदेव ३० वर्षांनंतर मीन राशीत होणार वक्री, २०२५ पासून उजळणार ‘या’ राशींचे भाग्य; मिळेल भरपूर सुख अन् आर्थिक लाभ

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीचे लोक कामानिमित्त लांबचा प्रवास करू शकतात. त्यातून तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. नोकरीच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही आनंदी आणि समाधानी जीवन जगू शकता. व्यवसायातही फायदा होईल. अनावश्यक खर्चाबाबत थोडे सावध राहावे लागेल. लव्ह लाईफ चांगले जाऊ शकते. जोडीदाराबरोबर तुमचा वेळ चांगला जाईल.

नवीन वर्ष २०२५ ध्ये अनेक दुर्मीळ राजयोग तयार होत आहेत; ज्यामुळे काही राशीच्या लोकांना बंपर लाभ होणार आहेत. त्याचप्रमाणे कर्म देणारा शनी आपले नक्षत्र बदलणार आहे; ज्यामुळे नवीन वर्षात काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात भरपूर आनंदाच्या गोष्टी घडू शकतात.

(टीप- वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader