Venus Transit in Virgo 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, एका ठराविक कालावधीनंतर प्रत्येक ग्रह त्याच्या स्थितीमध्ये बदल करतो. शुक्र ग्रह हा संपत्ती, समृद्धी, भौतिक सुख, आनंद, प्रेम यांचा कारक मानला जातो. कुंडलीत शुक्र ग्रहाच्या बदलामुळे व्यक्तीला यश मिळते. धनाचा दाता शुक्र काही काळानंतर राशी परिवर्तन करतो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र ग्रह हा व्यवस्थित असतो, तेव्हा त्या व्यक्तीचं नशीब सुद्धा साथ देत असतं, असे मानले जाते. आता येत्या २५ आॅगस्ट रोजी ०१.२५ वाजता शुक्रदेव कन्या राशीत गोचर करणार आहेत. १८ सप्टेंबरपर्यंत याच राशीत राहणार आहेत. त्यामुळे काही राशींना बक्कळ धनलाभ होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया या भाग्यशाली राशी कोणत्या…

‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा?

वृषभ राशी

शुक्रदेवाच्या गोचरामुळे वृषभ राशीच्या लोकांना भरपूर फायदा होण्याची शक्यता आहे. या काळात या राशीतील लोकांना व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. पैशाची बचत करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. तुम्हाला मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. नोकरदार लोकांना नोकरीत बढती मिळू शकते. कुटुंबात सुख-शांति नांदण्याची शक्यता आहे. यावेळी धार्मिक कार्यात तुमची रुची वाढू शकते.

Loksatta chaturang bhay bhuti Fear of an event in life
‘भय’भूती: भय-भोवरा
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार…
sun transit in libra
३६५ दिवसांनंतर ग्रहांचा राजा सूर्य तूळ राशीत करणार प्रवेश! ‘या; राशीच्या लोकांना मिळणार पद-प्रतिष्ठा, प्रत्येक कामात यश
Shadashtak yoga will create Saturn-Sun
शनी-सूर्य निर्माण करणार षडाष्टक योग; ‘या’ दोन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार संकटांचं वादळ होणार आर्थिक नुकसान
Surya transit in libra
नवरात्रीनंतर पैसाच पैसा! सूर्याच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात येणार यश, मानसन्मान आणि भौतिक सुख
guru gochar diwali 2024
दिवाळीनंतर गुरु ग्रह करणार चंद्राच्या नक्षत्रात प्रवेश! राजासारखे जीवन जगतील ‘या’ राशींचे लोक
Surya-Ketu yuti these three zodic sign
सूर्य-केतूची युती देणार भरपूर पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार आनंदी आनंद
shukra gochar 2024 after 4 days Venus enter in Libra
४ दिवसांनंतर नुसता पैसा; शुक्र करणार तूळ राशीत प्रवेश ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा

कर्क राशी

शुक्राचं गोचर कर्क राशीसाठी फायदेशीर ठरू शकते. तुम्हाला व्यवसायात नफा मिळू शकतो. उत्पन्नात घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे. अचानक मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. या काळात तुम्ही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुमच्या आयुष्यात तुम्हाला आनंदच आनंद मिळण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा : कृष्ण जन्माष्टमीपासून श्रीकृष्ण ‘या’ राशींना देतील भरपूर पैसे व गोड बातमी? बुधदेवाच्या उदयानं दिवस बदलून होऊ शकतात अफाट श्रीमंत )

कन्या राशी

शुक्रदेवाचे राशी परिवर्तन कन्या राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकते. या काळात मालमत्ता आणि वाहन खरेदी करू शकता. व्यवसायात सतत नफा मिळू शकतो. या काळात तुम्ही पैसा कमवण्यात आणि संपत्ती जमा करण्यात यशस्वी व्हाल. तुम्हाला गुंतवणुकीतून मोठा फायदा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला नशिबाची साथ मिळण्याची शक्यता आहे. कायदेशीर वादात अडकलेल्या लोकांना यावेळी दिलासा मिळण्याची शक्यता आहे.   

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या लोकांना शुक्रदेवाच्या कृपेने मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला गुंतवणुकीतून मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या सर्व मनोकामना या काळात पूर्ण होऊ शकतात. इतकंच नाही तर उत्पन्नाचे अनेक स्त्रोत निर्माण होऊ शकतात. शेअर मार्केटमधून तुम्हाला भरपूर धनलाभ होऊ शकतो. समाजातही तुम्हाला मान-प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)