Shukra Nakshatra Gochar 2024 : धन, आकर्षण आणि प्रेमाचा कारक शुक्र ग्रह ठरावीक कालावधीनंतर राशिचक्र, तसेच नक्षत्र बदलतो. शुक्राच्या या बदलाचा १२ राशींवर शुभ व अशुभ, असा परिणाम होत असतो. राक्षसांचा गुरू शुक्र सध्या भरणी नक्षत्रात आहे; पण १६ मे रोजी दुपारी ३.४८ वाजता शुक्र कृत्तिका नक्षत्रात प्रवेश करील. तिथे तो २७ मेपर्यंत स्थानपन्न असणार आहे. शुक्राच्या या नक्षत्रबदलाचा प्रभाव काही राशींच्या लोकांसाठी वाईट; तर काही राशींच्या लोकांसाठी चांगला असू शकतो. चला जाणून घेऊ त्या राशींबद्दल; ज्यांना शुक्राच्या या नक्षत्रबदलाचा मोठा फायदा होऊ शकतो…

ज्योतिषशास्त्रानुसार कृत्तिका हे २७ नक्षत्रांपैकी तिसरे नक्षत्र आहे. या नक्षत्राचा स्वामी सूर्य आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांचा समाजाती आदर वाढतो. त्याचबरोबर विवेक जागृत होऊन त्यांचे मनोबलही वाढते.

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्राचा कृत्तिका नक्षत्रातील प्रवेश फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांना प्रगतीबरोबर भौतिक सुखही मिळू शकते. दरम्यान, करिअरसाठी सुरू असलेली तुमची मेहनत आणि समर्पण आता दिसून येईल. तुमच्या कामामुळे तुमचे वरिष्ठ अधिकारी खूश होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा करण्याबरोबरच तुमचा बोनस किंवा काही पुरस्कार देऊन गौरव केला जाऊ शकतो. त्याचबरोबर तुम्हाला व्यवसायातही भरघोस नफा मिळू शकतो. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता. नातेसंबंध चांगले राहतील. जोडीदाराशी तुमचा चांगला समन्वय राहून, आरोग्य चांगले राहील.

येत्या २४ तासांनंतर हिऱ्यापेक्षाही चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब; बुधाच्या मेष राशीतील प्रवेशाने संपणार वाईट काळ

कन्या

शुक्राने कृत्तिका नक्षत्रात प्रवेश करताच कन्या राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडू शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामे पुन्हा एकदा सुरू होऊ शकतात. तुमचे लव्ह लाइफची वाटचालही चांगली होऊ शकते. अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाले, तर अनेक दिवसांपासूनची आर्थिक कोंडी आता दूर होऊ शकते. त्यामुळे तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊ शकते. करिअरबद्दल बोलायचे झाले, तर तुमची मेहनत लक्षात घेऊन मॅनेजर तुम्हाला काही मोठी जबाबदारी देऊ शकतो. पण, ती गोष्ट गांभीर्याने घ्या. कारण- ती बाब तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यास मदत करील. व्यवसायातही फायदा होऊ शकतो. तुम्हाला नवीन डील, प्रोजेक्ट किंवा ऑफर मिळू शकते. नात्यातही गोडवा येईल. प्रदीर्घ काळची चिंता आता संपुष्टात येईल.

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी शुक्राचे कृत्तिका नक्षत्रात प्रवेश करणे फलदायी ठरू शकते. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवाल. भौतिक सुखाची प्राप्ती होईल. त्यासोबतच प्रत्येक क्षेत्रात यशाबरोबर आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला कामासाठी लांबचा प्रवास करावा लागू शकतो; परंतु भविष्यात तुम्हाला याचा फायदादेखील होऊ शकतो. या काळात नवीन व्यवसाय सुरू करणे फायदेशीर ठरू शकते. जोडीदाराशी जवळीक वाढेल. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. आरोग्य चांगले राहील.