Shukra Gochar 2024: ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा सुख-समृद्धी, धन-वैभव, मान-सन्मान, प्रेमाचा कारक ग्रह मानला जातो. यामुळे शुक्राच्या राशी किंवा नक्षत्र बदलाचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष परिणाम १२ राशीच्या लोकांवर पडत असतो. शुक्र ठराविक कालावधीनंतर राशिचक्रांसह नक्षत्र बदलतो, ज्याचा परिणाम निश्चितपणे प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर होतो. यावेळीस शुक्र पूर्वाषाधा नक्षत्रात स्थित होता. पण २९ नोव्हेंबरपासून शुक्राने नक्षत्र बदलून उत्तराषाढ नक्षत्रात प्रवेश केला आहे. शुक्राच्या नक्षत्र बदलाने काही राशीच्या लोकांना मोठा लाभ मिळू शकतो. शुक्राचे उत्तराषाढ नक्षत्रातील प्रवेशाने कोणत्या राशींना लाभ होऊ शकतो जाणून घेऊ…

द्रिक पंचांगनुसार, शुक्र २९ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजून ३७ मिनिटांनी उत्तराषाढ नक्षत्रात प्रवेश करेल. यानंतर ११ डिसेंबरपर्यंत या नक्षत्रात राहील. अवकाशातील २७ नक्षत्रांपैकी उत्तराषाढ हे 21 वे नक्षत्र आहे. या नक्षत्राचा स्वामी सूर्यदेव आहे.

Mangal vakri 2024 Mangal in kark rashi astrology
Mangal Vakri 2024 : डिसेंबर महिन्यात ‘या’ तीन राशींना लागणार बंपर लॉटरी! मंगळ वक्रीमुळे संपत्तीत होईल प्रचंड वाढ अन् करियरमध्ये प्रगती
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
3 December 2024 Mesh To Meen Horoscope in Marathi
३ डिसेंबर पंचांग: आजचा शूल योग मेष, मिथुनला देईल अपार यश; बाप्पाच्या कृपेने तुम्हाला कसा होईल लाभ? वाचा मंगळवारचे राशिभविष्य
Horoscope 2025 Malavya rajyog in meen shukra gochar
Malavya Rajyog 2025 : नवीन वर्षात ‘या’ राशींची होणार आर्थिक भरभराट! मालव्य राजयोगामुळे बनाल अमाप संपत्तीचे मालक अन् घराचे स्वप्न होईल पूर्ण
Guru Margi 2025
Guru Margi 2025: १२ वर्षांनंतर मार्गी होणार गुरू, २०२५ मध्ये ‘या’ तीन राशींचे फळफळणार नशीब, मिळणार अपार संपत्ती अन् धन
Navpancham rajyog 2024 astrology
Navpancham Rajyog 2024: २ डिसेंबरपासून चमकणार ‘या’राशींचे नशीब; नवपंचम राजयोगामुळे मिळणार गडगंज पैसा अन् मानसन्मान

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी शुक्राचा नक्षत्र बदल फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंद येऊ शकतो. अनेक गोष्टीत तुम्हाला आजूबाजूच्या लोकांकडून पूर्ण पाठिंबा मिळू शकतो. या काळात पगारवाढीची शक्यता आहे. लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित करू शकतात. ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकतात. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला यश मिळू शकते. मानसिक तणावातून आराम मिळू शकतो. आयुष्यात सुख आणि शांतीचे दिवस येऊ शकतात. या कळात तुमच्या कानावर एखादी चांगली बातमी पडू शकते.

Shani Margi 2024 : शनीदेव कुंभ राशीत मार्गी! कुंभसह ‘या’ तीन राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा अन् यश

कर्क

शुक्राचा नक्षत्र बदल कर्क राशीच्या लोकांसाठी देखील फलदायी ठरू शकतो. या राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते.स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे लोक यश मिळवू शकतात. कुटुंबात सुरू असलेल्या समस्या आता संपू शकतात. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. या काळात लव्ह लाईफ चांगली राहू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले होतील यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होऊ शकते.

मीन

शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने मीन राशीच्या लोकांच्या आयुष्यातही सुखाचे आनंदाचे दिवस येऊ शकतात. या राशीचे लोक आत्मनिरीक्षण करतील, स्वतःकडे थोडे लक्ष देतील आणि काही बदल करतील. याच्या मदतीने त्यांना अनेक कामात अफाट यश मिळवता येऊ शकते. कुटुंबाबरोबर चांगला वेळ जाईल. तुम्ही तुमच्या कामात शंभर टक्के द्याल, ज्यामुळे तुम्हाला खूप फायदा मिळण्याची शक्यता आहे. जीवनात सुख-शांती नांदेल.

(टीप – सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)