Bhadra And Malavya Rajyog 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा ग्रह वेळोवेळी राशी बदलतात, तेव्हा अनेक वेळा शुभ राजयोग तयार होतात, ज्याचा परिणाम सर्व जगावर होतो. यातच आता जून महिन्यात एकाच वेळी दोन राजयोगांचा अद्भुत योग जुळून येणार आहे. ज्यात शुक्र ग्रह आपल्या वृषभ राशीत भ्रमण करेल आणि मालव्य राजयोग निर्माण करेल. यानंतर, बुध स्वतःच्या राशी मिथुनमध्ये भ्रमण करेल आणि भद्र राजयोग निर्माण करेल. अशा स्थितीत, ५० वर्षांनी भद्र आणि मालव्य राजयोग एकत्र तयार होत आहेत. ज्यामुळे काही राशींचं नशीब पालटू शकतं. या अद्भुत संयोगामुळे तीन राशींचे नशिब बदलणार आहे. लक्ष्मीची असीम कृपा या राशींवर होणार असून धनसंपत्तीमुळे बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊया त्या राशी कोणत्या आहेत.
‘या’ तीन राशींचे फळफळणार नशीब?
सिंह
दोन राजयोगांची निर्मिती सिंह राशीच्या मंडळींसाठी फायदेशीर ठरू शकते. या योगामुळे तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ पाहायला मिळू शकते. तुमचे सर्व प्रलंबित कामे किंवा कामातील अडथळे दूर होऊ शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना या काळात चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता राहील. या महिन्यात नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांसोबत गोडवा वाढू शकतो.
कन्या
दोन राजयोगांची निर्मिती कन्या राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकते. या काळात तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. प्रेम आणि वैवाहिक जीवनात आनंद राहू शकतो. तसेच, तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला चांगलं यश मिळू शकतो. या काळात समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसून येऊ शकतो. तसेच, तुमच्या व्यवसायाचा देखील विस्तार होऊ शकतो. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. या काळात केलेल्या प्रयत्नांचे चांगले परिणाम मिळू शकतात.
मकर
दोन राजयोगांची निर्मिती मकर राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. व्यापारी वर्गातील लोकांना नवीन ऑर्डर्स मिळू शकतात. बेरोजगारांना नवीन रोजगार मिळू शकतो. तसेच, तुमचं परदेशात जाण्याचं स्वप्नदेखील पूर्ण होऊ शकते. या काळात तुम्हाला करिअरमध्ये चांगला लाभ मिळू शकतो. तुमच्या सर्व समस्या दूर होऊ शकतात. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या कामांना गती मिळू शकते. आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)