Shukra Gochar 2025: ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्राला प्रेम, धनसंपत्ती आणि भौतिक सुख सुविधांचा कारक मानले जाते. जेव्हा शुक्र आपल्या राशी बदलतो, त्याचा परिणाम १२ राशींवर दिसून येतो. वैदिक पंचागनुसार, २९ जून रोजी शुक्र ग्रह मेष राशीतून बाहेर पडून आपल्या स्वाभाविक राशी वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. हा गोचर काही राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे तर काही राशींच्या लोकांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. विशेष करून या तीन राशीच्या लोकांनी गोचर दरम्यान विशेष सतर्क राहणे आवश्यक आहे. त्या तीन राशी कोणत्या आहेत, जाणून घेऊ या.
मिथुन राशी (Mithun Zodiac)
ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रह मिथुन राशीच्या द्वादश भावात गोचर करणार आहे, जो हानिकारक आणि खर्च करणारा भाव मानला जातो. अशात या गोचरच्या प्रभावामुळे या लोकांना धनसंपत्ती संबंधिक प्रकरणात सतर्क राहावे लागेल. या वेळी या लोकांनी गुंतवणूक विचारपूर्वक करावी आणि अनोळखी लोकांपासून अंतर ठेवावे. कारण या लोकांची फसवणूक होऊ शकते. या लोकाचा आत्मविश्वास थोडा कमकुवत राहीन आणि दुसऱ्यांपासून मदतीची अपेक्षा पूर्ण होऊ शकणार नाही. मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडू शकते. जे लोक विदेशी व्यवसाय आणि मल्टीनॅशनल कंपन्याशी जुळलेले आहेत, त्या लोकांना अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.
तुळ राशी (Tula Zodiac)
तुळ राशीपासून शुक्राचा गोचर अष्टम भावात आहे. हा भाव अचानक घटना, मानसिक तणाव आणि करिअरशी संबंधिक बदलांचा कारक असतो. या दरम्यान या लोकांच्या कामाच्या ठिकाणी काही नकारात्मक घटना घडू शकतात. वरिष्ठांकडून टीका ऐकावी लागू शकते. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला यश मिळवण्यासाठी आणखी मेहनत घ्यावी लागेल. उसणे देणे आणि घेणे या काळात योग्य नाही. कारण धन अडकण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण चांगले राहीन. प्रियजनांबरोबर वेळ घालवणे गरजेचे राहीन.
मकर राशी (Makar Zodiac)
मकर राशीच्या पंचम भावात शुक्र गोचर करणार आहे. ज्यामुळे या लोकांचा आळशीपणा वाढेल. त्यांचा कामाविषयी निष्काळजीपणा दिसू शकतो. नशिबावर अवलंबून राहणे योग्य नाही. कारण यश मिळवण्यासाठी मेहनत घेणे आवश्यक आहे. अपत्यांविषयी काळजी आणि त्यांच्या भविष्याला घेऊन चिंता वाढेल. अचानक धन हानि होण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळ खर्च जपून करावा आणि बजेटनुसार पैसे खर्च करावे.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)