Venus Planet Gochar 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, एका ठराविक कालावधीनंतर प्रत्येक ग्रह त्याच्या स्थितीमध्ये बदल करतो. शुक्र ग्रह हा संपत्ती, समृद्धी, भौतिक सुख, आनंद, प्रेम यांचा कारक मानला जातो. कुंडलीत शुक्र ग्रहाच्या बदलामुळे व्यक्तीला यश मिळते. धनाचा दाता शुक्र काही काळानंतर राशी परिवर्तन करतो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र ग्रह हा व्यवस्थित असतो, तेव्हा त्या व्यक्तीचं नशीबसुद्धा साथ देत असतं. त्याचबरोबर त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्वसुद्धा चमकू लागते, अशी मान्यता आहे. आता पुढील महिन्यात १६ मे रोजी शुक्र बुध आणि गुरुच्या रेवती नक्षत्रात संक्रमण करेल आणि ३१ मे २०२५ रोजी शुक्र मेष राशीत प्रवेश करेल. अशाप्रकारे शुक्र ग्रहाच्या हालचालीत दोनदा बदल होईल, ज्यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते. तसेच या राशींच्या बँक बॅलेन्समध्ये मोठी वाढ होऊ शकते. चला जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत…

शुक्रदेवाच्या कृपेमुळे ‘या’ राशींच्या नशिबाला मिळेल श्रीमंतीची कलाटणी?

मेष

शुक्रदेवाच्या कृपेने मेष राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. उत्पन्नाचे नवे स्त्रोत खुले होऊ शकतात. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली असू शकते. तुम्हाला मित्र आणि कुटुंबीयांकडून पूर्ण सहकार्य मिळू शकते. आरोग्यही चांगलं राहण्याची शक्यता आहे. तुमच्यासाठी नोकरीच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. यासह तुमच्या कामाचं कौतुक केलं जाऊ शकतं. तुमच्या संपत्तीतही वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला तुमच्या वडिलांकडून लाभ होऊ शकतो. कामातून आर्थिक फायदा होऊ शकतो.

कर्क

शुक्रदेवाच्या कृपेने कर्क राशीच्या लोकांना लवकरच चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांची भरपूर पैसा कमावण्याची इच्छा आता पूर्ण होऊ शकते. या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. काही मोठा निर्णय घेऊ शकता. त्याचा भविष्यात भरपूर लाभ मिळू शकतो. अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. तुम्ही केलेल्या धोरणांच्या प्रभावामुळे विशेष लाभ मिळू शकतात. तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात तुम्हाला अनेक संधी मिळू शकतात. परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते.

सिंह

सिंह राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. पदोन्नतीत विशेष लाभ मिळू शकतो. तुम्हाला परदेशात काम करण्याची संधीही मिळू शकते. व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. व्यवसायात प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्यात यशस्वी होऊ शकता, यामुळे तुमची संपत्ती वाढू शकते. अधिकाधिक पैसे कमवू शकाल. प्रेम आणि वैवाहिक जीवनात फायदा होऊ शकतो. व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळण्याची शक्यता आहे. परदेशात राहणाऱ्यांनाही खूप फायदा होऊ शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)