Shukra Nakshatra Parivartan 2025 Impact in Marathi: ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला धन, संपत्ती, सौंदर्य, भौतिक सुख व आकर्षणाचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो अशा व्यक्तींना आयुष्यात कधीही कुठलीच आर्थिक चणचण भासत नाही. त्याशिवाय अशा व्यक्तीचे प्रेमसंबंधदेखील उत्तम असतात. वैदिक ज्योतिष्यशास्त्रानुसार संपत्ती, समृद्धी आणि विलासी जीवनाचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह ठराविक कालावधीनंतर आपली राशी बदलतो. याशिवाय त्याचं नक्षत्रही काही काळानंतर बदलतं. शुक्र ग्रह लवकरच नक्षत्र परिवर्तन करणार आहे. १३ जून २०२५ रोजी शुक्र भरणी नक्षत्रात प्रवेश करणार असून, या बदलामुळे काही राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. या काळात शुक्रदेव तीन राशींवर प्रचंड कृपावर्षाव करणार आहेत. यामध्ये कोणत्या राशीला नेमका कसा लाभ होऊ शकतो, हे जाणून घेऊया..

शुक्राच्या भरणी नक्षत्र प्रवेशामुळे ‘या’ राशींना होणार मोठा फायदा?

मेष

शुक्राच्या नक्षत्र बदलामुळे मेष राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होऊ शकतो. अचानक पैसे मिळू शकतात. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊ शकतात. कर्जमुक्तीची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांच्या पद आणि प्रतिष्ठेत वाढ होण्याची शक्यता आहे. अविवाहितांचे विवाह निश्चित होण्याची शक्यता आहे. घरामध्ये मांगलिक कार्यांचे आयोजन होऊ शकते. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीचे योग आहेत. आपल्या वैवाहिक नात्यात गोडवा वाढण्याची चिन्हे आहेत.

मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्तींना शुक्राच्या नक्षत्र बदलामुळे शुभ परिणाम मिळू शकतात. नवीन आर्थिक संधी प्राप्त होऊ शकतात. बेरोजगार आहेत त्यांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. कार्यक्षेत्रात यश आणि पदोन्नती मिळू शकते. थांबलेले कामे पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला भागीदारीत केलेली कामं खूप लाभ मिळवून देऊ शकतात. तुम्हाला कामाच्या निमित्ताने परदेशवारीचा योग येऊ शकतो. वैवाहिक जीवनात सुखद अनुभव येऊ शकतात. घरात शुभकार्य होण्याची शक्यता आहे.

कन्या

शुक्राचे नक्षत्र परिवर्तन कन्या राशीच्या लोकांसाठी अत्यंत फलदायी ठरु शकते. करिअरमध्ये महत्त्वाची उपलब्धी मिळू शकते. धनप्राप्तीचे मार्ग खुले होऊ शकतात. यश-प्रगतीच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. प्रलंबित कामे पूर्ण करता येऊ शकतील. व्यवसायात वाढ होऊ शकते. पैतृक मालमत्तेचा लाभ होऊ शकतो. विद्यार्थ्यांना परीक्षांमध्ये यश मिळू शकतो. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होऊ शकते. समाजातही आदर वाढू शकतो. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)