Shukra Gochar 2026 Impact : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार संपत्ती, ऐश्वर्य व सुख-सुविधांचा कारक मानला गेलेला शुक्र ग्रह लवकरच चाल बदलणार आहे. येत्या ६ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १२:४५ वाजता शुक्र पुन्हा एकदा कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र सुमारे दोन महिन्यांनंतर म्हणजेच ६५ दिवसांच्या कालावधीनंतर कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. या ग्रहबदलाचा ५ भाग्यशाली राशींच्या लोकांवर अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार आहे आणि त्यामुळे या लोकांच्या आयुष्यात मोठी प्रगती पाहायला मिळू शकते.

ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र कन्या राशीमध्ये आल्याने वृषभ, मिथुन, सिंह, कन्या व धनु या पाच राशींच्या लोकांना धन-धान्याची कमतरता भासणार नाही. या काळात नशिबाची पूर्ण साथ मिळाल्यामुळे प्रत्येक कामात घवघवीत यश मिळण्याचे संकेत आहेत.

१. वृषभ

या काळात वृषभ राशीच्या लोकांना आपल्या कामांमध्ये मोठे यश मिळेल, तसेच अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. नशिबाची साथ मिळाल्यामुळे उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. वैवाहिक जीवनातील सर्व ताणतणाव दूर होऊन जोडीदारासह उत्तम वेळ घालवता येईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल, कुटुंबातील समस्या संपुष्टात येतील आणि नातेसंबंध अधिक घट्ट होतील. तसेच तुमची व्यावसायिक स्थिती पूर्वीपेक्षा खूप मजबूत होईल.

२. मिथुन

हा काळ मिथुन राशीच्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळात तुम्हाला एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. अचानक धनलाभ होण्याचे प्रबल योग तयार होत आहेत. घरातील वातावरण आनंदी राहील आणि भौतिक सुख-सुविधांमध्ये मोठी वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांच्या कामात सुधारणा होईल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील.

३. सिंह

या काळात सिंह राशीच्या लोकांना आपले धैर्य आणि पराक्रम दाखवण्याची उत्तम संधी मिळेल. कार्यालयात उच्च अधिकारी तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील. नोकरी आणि रोजगारात प्रगती होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. जर न्यायालयीन प्रकरणे सुरू असतील, तर त्यात विजय मिळू शकतो. शत्रूंवर तुमची मजबूत पकड राहील आणि नात्यांमधील गैरसमज दूर होतील. कोणतीही चांगली बातमी मिळाल्यामुळे मन दिवसभर प्रसन्न राहील.

४. कन्या

हा काळ कन्या राशीच्या लोकांसाठी अतिशय उत्तम आणि लाभदायक राहणार आहे. अचानक आर्थिक लाभ झाल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती झपाट्याने सुधारेल. भविष्यात चांगला परतावा मिळण्यासाठी गुंतवणुकीचे उत्तम मार्ग हातात येतील. जर तुम्ही नवीन कामाची सुरुवात करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ अतिशय योग्य आहे. व्यापारी वर्गाच्या बाबतीत मोठ्या व्यवहाराला अंतिम स्वरूप मिळण्याची शक्यता आहे.

५. धनु

या काळात धनु राशीच्या लोकांना नशिबाची भक्कम साथ मिळेल. तुमचे रखडलेले पैसे परत मिळतील आणि व्यवसायातील सर्व अडचणी दूर होतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक मधुर होईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे, विशेषतः स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांना एखादी गोड बातमी मिळू शकते.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)