Shukra Gochar 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्र हा एक शक्तिशाली ग्रह मानला जातो. शुक्र एका विशिष्ट कालावधीनंतर राशी तसंच नक्षत्र बदलतो, त्याचा प्रभाव १२ राशींमध्ये तसंच जागतिक स्तरावरही दिसून येतो. या वेळी शुक्र कन्या राशीत बसला आहे. २५ ऑगस्ट रोजी शुक्र हस्त नक्षत्र सोडून चित्रा नक्षत्रात प्रवेश करेल. शुक्राच्या या नक्षत्र बदलाचा परिणाम १२ राशींच्या आयुष्यात दिसून येणार आहे. मंगळ राशीत शुक्राच्या प्रवेशाचा वृषभ, वृश्चिक आणि मकर राशीच्या लोकांना विशेष फायदा होऊ शकतो. आर्थिक नफ्यासह नोकरी आणि व्यवसायात तसंच वैवाहिक सुखही मिळू शकते.

पंचांगानुसार, संपत्ती आणि समृद्धी देणारा शुक्र मंगळवार २५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांनी चित्रा नक्षत्रात प्रवेश करेल आणि ११ सप्टेंबरपर्यंत या नक्षत्रात राहील. यानंतर स्वाती नक्षत्रात प्रवेश करेल. आकाशगोलातील २७ तारकासमूहांपैकी चित्रा हा १४वा तारकासमूह आहे. या नक्षत्राचा स्वामी मंगळ आहे. हे नक्षत्र कन्या आणि तूळ या राशीच्या अंतर्गत येते. या नक्षत्रात शुक्राचे येणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे लक्झुरीमध्ये वाढ होण्यासोबतच प्रेम, रोमान्स वाढू शकतो. उत्पन्नात वाढ होऊन बचत करण्यात ते यशस्वी होतात.

वृषभ राशी

या राशीत शुक्र पाचव्या भावात विराजमान असेल. तुम्हाला अधिकाधिक क्रिएटिव्हटी दिसून येईल, त्यामुळे तुम्ही नवीन कला शिकू शकता. कारकि‍र्दीला चांगली चालना मिळू शकते. बौद्धिक क्षमताही वाढू शकते. बऱ्याच वेळेपासून रखडलेली कामे पूर्ण झाल्याने आर्थिक परिस्थिती चांगली राहते आणि भविष्यासाठी पैशांची बचत करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. आत्मविश्वास वाढण्याबरोबर काहीतरी करण्याची जिद्ददेखील येते. तसंच कधीकधी आपण चुकीचा निर्णय घेऊ शकता. त्यामुळे थोडा हुशारीने निर्णय घेण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ खूप चांगला असू शकतो. कला, संगीत इत्यादींशी संबंधित विद्यार्थ्यांना लाभ मिळू शकेल.

वृश्चिक राशी

शुक्र या राशीच्या ११व्या घरात चित्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांच्या अनेक प्रलंबित इच्छा पूर्ण होऊ शकतात. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत खुले होऊ शकतात. अशा परिस्थितीत तुमची आर्थिक स्थिती चांगली असल्याने तुम्ही भविष्यासाठी पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकता. कर्जाचे पैसे परत करता येतील. मोठ्या लोकांच्या संपर्कात याल. नोकरदारांना पदैन्नती तसंच इच्छित ठिकाणी प्रगती होईल. वेग थोडा मंद असेल. तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळू शकते, त्यामुळे तुम्ही अनेक क्षेत्रात यशस्वी होऊ शकता. वैवाहिक आयुष्यात आणि पार्टनरशिपच्या कामात तणाव किंवा तोटा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संयमाने बोलाल तर यश मिळू शकते.

मकर राशी

शुक्र तुमच्या नशिबाच्या घरात असेल. पाचव्या आणि कर्मघराचा स्वामी असलेला शुक्र चित्रा नक्षत्रात प्रवेश करेल आणि नवव्या घरात प्रवेश करेल. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना नशिबाचा पूर्ण आधार मिळू शकतो. आयुष्यातील समस्या संपू शकतात. प्रतिष्ठेत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे दीर्घकाळ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. जर तुम्ही दीर्घकाळापासून कठोर परिश्रम करत असाल तर आता तुम्हाला त्यात यश मिळू शकते. नोकरदार व्यक्तींसाठी हा काळ चांगला असू शकतो. तुम्ही तुमच्या कामावर पूर्ण लक्ष द्याल, त्यामुळे यश मिळू शकते. सोबतच व्यवसाय करणाऱ्यांनाही लाभ मिळू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला असू शकतो.