Shukra Swati Nakshatra Gochar 2026 : ११ सप्टेंबर २०२६ रोजी म्हणजेच कुशग्रहणी अमावास्येच्या दिवशी शुक्र देव स्वाती नक्षत्रात प्रवेश करतील आणि २४ ऑक्टोबरपर्यंत ते याच नक्षत्रात राहतील. त्यानंतर ते चित्रा नक्षत्रात प्रवेश करतील. स्वाती नक्षत्रात शुक्राचे गोचर काही राशींच्या लोकांसाठी फलदायी ठरेल. या राशींच्या लोकांच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होऊन आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा पाहायला मिळेल.
वृषभ
शुक्राचे हे नक्षत्र गोचर वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. तुम्हाला तुमच्या कष्टाचे पूर्ण फळ मिळेल. अडकलेली कामे पूर्ण होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल आणि विविध मार्गांनी धनलाभ होऊ शकतो. तुमच्या भौतिक इच्छा पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल, तसेच नोकरीत पदोन्नतीची (प्रमोशन) शक्यता आहे.
मिथुन
शुक्राचे हे गोचर मिथुन राशीसाठी शुभ ठरेल. अचानक धनलाभाचे योग बनत आहेत. गुंतवणुकीतून चांगला परतावा किंवा नफा मिळू शकतो. अविवाहित लोकांसाठी लग्नाचे नवीन प्रस्ताव येऊ शकतात. अडकलेली कामे मार्गी लागतील. नवीन घर किंवा वाहन घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. तुम्ही नवीन योजनांवर काम सुरू करू शकता.
तूळ
या राशीच्या लोकांचे भाग्य ११ सप्टेंबरपासून उजळणार आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळू शकतो आणि कर्जातून मुक्ती मिळण्याचे योग आहेत. कला, मीडिया, फॅशन, डिझायनिंग आणि ग्लॅमर क्षेत्राशी जोडलेल्या लोकांना मोठे यश मिळू शकते. व्यापाऱ्यांना नवीन प्रोजेक्ट मिळू शकतात. जोडीदाराबरोबरचे संबंध अधिक दृढ होतील.
कुंभ
या राशीच्या लोकांची प्रदीर्घ काळापासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा दिसून येईल. प्रत्येक कामात नशिबाची पूर्ण साथ लाभेल. व्यवसायाच्या निमित्ताने केलेले प्रवास लाभदायक ठरतील. परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. समाजात मान-सन्मान वाढेल. नोकरीत पदोन्नतीसह पगारवाढीची शक्यता आहे.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
