Shukra Gochar: ज्योतिषशास्त्रातील मान्यतेनुसार शुक्र ग्रहाचा उदय झाल्यानंतर त्याचे शुभ परिणाम वाढतात असे मानले जाते. विशेषतः पैसा, कला, सर्जनशीलता, व्यवसाय, सुख-सुविधा आणि नातेसंबंधांशी संबंधित कामांना वेग येण्याची शक्यता असते. शुक्र ग्रहाचा तूळ राशीशी विशेष संबंध आहे, कारण तूळ ही शुक्राच्या स्वामित्वाची एक रास आहे. या राशीत शुक्र चांगले परिणाम देतात असे मानले जाते.

अशा परिस्थितीत शुक्राची मजबूत स्थिती काही राशींच्या लोकांसाठी करिअरमध्ये नवीन संधी, पद आणि प्रतिष्ठा वाढणे तसेच आर्थिक लाभाचे संकेत देऊ शकते. तसेच धन-संपत्ती मिळण्याची शक्यता असते. मात्र, प्रत्यक्ष परिणाम व्यक्तीच्या जन्मकुंडली, दशा आणि इतर ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असतात.

पंचांगानुसार वैभव देणारा शुक्र ग्रह १४ ऑक्टोबर रोजी रात्री १ वाजून २० मिनिटांनी अस्त होईल. त्यानंतर शुक्र ग्रह २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी उदय होईल. म्हणजेच शुक्र ग्रह जवळपास १४ दिवस अस्त अवस्थेत राहतील.

मकर राशी (Capricorn Zodiac)

मकर राशीच्या लोकांसाठी शुक्राचा उदय करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. नोकरीमध्ये नवीन जबाबदारी किंवा बढती मिळण्याची संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांनाही नवीन ओळखी आणि फायदेशीर व्यवहारांमुळे फायदा होऊ शकतो. आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी नवीन मार्ग खुले होऊ शकतात.

कर्क राशी (Cancer Zodiac)

कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्राचा उदय आर्थिक दृष्टीने शुभ ठरू शकतो. उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात किंवा अचानक आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी चांगल्या संधी मिळू शकतात. बऱ्याच काळापासून रखडलेले एखादे आर्थिक काम पुढे सरकू शकते. घर आणि कुटुंबाच्या सुख-सुविधांवर खर्च करण्याचीही शक्यता आहे.

कन्या राशी (Virgo Zodiac)

कन्या राशीच्या लोकांना शुक्राच्या उदयानंतर करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळू शकतात. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्या लोकांना चांगली संधी मिळू शकते. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना नवीन करार किंवा नवीन ग्राहक मिळाल्यामुळे फायदा होऊ शकतो. आर्थिक बाबतीतही परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होऊ शकते.

कुंभ राशी (Aquarius Zodiac)

कुंभ राशीच्या लोकांसाठी शुक्राचा उदय करिअर आणि आर्थिक बाबतीत फायदेशीर ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळण्यासोबतच तुमची प्रतिष्ठाही वाढू शकते. बढती किंवा पगारवाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना नवीन प्रोजेक्ट किंवा भागीदारीतून फायदा होऊ शकतो. परदेशाशी संबंधित काम करणाऱ्या लोकांसाठीही नवीन संधी मिळू शकतात.

तूळ राशी (Libra Zodiac)

तूळ रास ही शुक्राच्या स्वामित्वाची रास आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी शुक्राची स्थिती विशेष महत्त्वाची असते. शुक्राच्या उदयानंतर आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्वातील आकर्षण वाढू शकते. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात आणि आर्थिक स्थिती मजबूत करण्याचे मार्ग खुले होऊ शकतात. व्यवसाय आणि सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी हा काळ विशेष चांगला ठरू शकतो.

शुक्र ग्रहाला वैभव देणारा ग्रह का मानले जाते?

वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्राला भौतिक सुख, पैसा, वैभव, सौंदर्य, प्रेम, कला, ऐषआराम आणि वाहनांचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे कुंडलीमध्ये शुक्र कोणत्या राशीत, कोणत्या भावात आणि कोणत्या दशेत आहे, हे आर्थिक तसेच भौतिक सुखांचा अंदाज घेण्यासाठी महत्त्वाचे मानले जाते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)