scorecardresearch

मालव्य राजयोग बनल्याने ‘या’ राशी होतील अपार श्रीमंत? बक्कळ धनलाभाने शुक्राचं चांदणं अनुभवू शकता

Shukra Gochar In Taurus: शुक्र गोचराने ६ एप्रिल २०२३ पासून तीन राशींच्या भाग्यात अत्यंत शुभ असा मालव्य राजयोग सुद्धा तयार होत आहे.

Shukra Gochar Create Malavya Rajyog These Zodiac Signs To Get More Money Venus Transit Shines On April 2023 Astrology
६ एप्रिलपासून 'या' राशी होणार श्रीमंत? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Venus Transit 2023 Effects: वैदिक ज्योतिषशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार शुक्र हा ग्रह भौतिक सुख, वैभव, धन, प्रेम, सौंदर्य यांचा कारक मानला जातो. यामुळेच जेव्हा एखाद्या राशीत शुक्राचे गोचर होते तेव्हा त्याचे नशीब पालटायला सुरुवात होऊ शकते. जर तुमच्या राशीत शुक्र उत्तम स्थानी असेल तर त्याचा प्रभाव सुख व धन वृद्धीवर होताना दिसू शकतो. इतकेच नाही तर शुक्राच्या प्रभावाने प्रेमाचे चांदणे सुद्धा नशिबात चमकू शकते. आनंदाची वार्ता म्हणजे येत्या १० दिवसात प्रेमगुरू शुक्रदेव हे वृषभ राशीत प्रवेश घेत आहेत. निव्वळ प्रवेशच नव्हे तर शुक्र गोचराने ६ एप्रिल २०२३ पासून तीन राशींच्या भाग्यात अत्यंत शुभ असा मालव्य राजयोग सुद्धा तयार होत आहे. या राजयोगाचा लाभ नेमक्या कोणत्या राशीला व कसा होणार हे आपण पाहूया…

शुक्रदेव मालव्य राजयोगासह ‘या’ राशींना करणार मालामाल?

मेष रास (Aries Zodiac)

मेष राशीच्या मंडळींसाठी वृषभ राशीतील शुक्र गोचर अत्यंत शुभ सिद्ध होऊ शकते. हे गोचर होतास आपल्या राशीच्या कर्म स्थानी मालव्य राजयोग तयार होत आहे. यामुळे येत्या काळात आपल्या आयुष्यात प्रेमाची पालवी सजून निखळ आनंद वाढीस लागू शकतो. वैभवलक्ष्मी माता सुद्धा आपल्या भाग्याला साथ देऊ शकते. तुमच्या सुप्त मनोकामना पूर्णत्वास नेऊ शकता. तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. विशेषतः बचत करण्याकडे लक्ष द्या.

कर्क रास (Cancer Zodiac)

शुक्र गोचर कर्क राशीच्या मंडळींना सर्वतोपरी यशस्वी बनवू शकते. तुमच्या इच्छा पूर्ण होताच आनंदाची संधी लाभू शकते. नवीन घेत व गाडीमध्ये गुंतवणूक करण्याची संधी आहे. तुमच्या कौटुंबिक एकोप्याने मनाचा ताण निघून जाऊ शकतो. व्यवसायात यशाचे योग आहेत. कामाच्या ठिकाणी मन, डोक व वाणीमध्ये गोडवा व थंडावा असूद्या. यामुळे तुम्ही सहकाऱ्यांच्या मर्जीत राहू शकता, याच माध्यमातून आपल्याला धनलाभाचे योग आहेत.

हे ही वाचा<< १० मे पर्यंत ‘या’ राशींचा बँक बॅलन्स वेगाने वाढणार? मंगळ कृपेने लक्ष्मी देऊ शकते नशिबाला कलाटणी

सिंह रास (Leo Zodiac)

सिंह राशीच्या मंडळींसाठी करिअरमध्ये प्रगतीचा योग आहे. धनलाभाची सुरुवात घरापासून होऊ शकते. तुमच्या भाग्यात धनलाभाचे प्रबळ योग आहेत. पैसे येतील तसे जाण्याचे सुद्धा योग आहेत म्हणूनच आधीच सावध होऊन तुम्ही गुंतवणूक सुरु करायला हवी. तुमच्या आयुष्यात वैवाहिक सुखाचे योग आहेत. प्रेमाच्या माणसाच्या रूपात तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद लाभू शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 17:18 IST

संबंधित बातम्या