Shukra Gochar 2026: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशीपरिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते. पंचांगानुसार, दैत्यगुरू शुक्र ०१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ०९ वाजून ३३ मिनिटांनी सूर्याच्या सिंह राशीतून बुधाच्या कन्या राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत तो ०२ सप्टेंबरपर्यंत असेल. शुक्राच्या या राशी परिवर्तनाचा प्रभाव १२ पैकी काही राशींवर पडेल.
शुक्र राशी परिवर्तनाने ‘या’ राशींचे भाग्य उजळणार
वृषभ (Vrushabh Rashi)
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे राशी परिवर्तन खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा.
कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील.
धनु (Dhanu Rashi)
शुक्राचे राशी परिवर्तन धनु राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील.
वृश्चिक (Vruschik Rashi)
वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे राशी परिवर्तन अनुकूल ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल.
मकर (Makar Rashi)
मकर राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे हे गोचर खूप अनुकूल असेल. धन-संपत्तीत प्रचंड वाढ होईल. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. त्यामुळे आजपर्यंत जे अशक्य वाटत होते, ते शक्य करून दाखवाल. गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. या लोकांच्या आयुष्यात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
