Shukra Gochar 2026 : ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रह विवाह, सुख, संपत्ती आणि समृद्धीशी संबंधित आहे. शुक्र एका विशिष्ट कालावधीनंतर आपली राशी आणि नक्षत्र बदलतो, ज्यामुळे १२ राशींच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होत असतो. सध्या शुक्र ग्रह मेष राशीत आणि भरणी नक्षत्रात आहे. १६ एप्रिल रोजी शुक्र कृतिका नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांना सकारात्मक परिणाम अनुभवता येऊ शकतात.
पंचांगानुसार, शुक्र ग्रह १६ एप्रिल रोजी रात्री १० वाजून १९ मिनिटांनी कृतिका नक्षत्रात प्रवेश करणार आहे आणि २७ एप्रिलपर्यंत तो तिथेच राहील. त्यानंतर तो रोहिणी नक्षत्रात प्रवेश करेल. कृतिका हे आकाशातील २७ नक्षत्रांपैकी तिसरे नक्षत्र आहे. या नक्षत्राचा स्वामी सूर्य असून, त्याच्या राशी मेष आणि वृषभ आहेत. सध्या शुक्राबरोबर सूर्यदेखील मेष राशीत आहे, ज्यामुळे शुक्रादित्य राजयोग तयार होत आहे. त्यानंतर शुक्र १९ एप्रिल रोजी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. अशा परिस्थितीत मालव्य राजयोग तयार होईल. शुक्राच्या कृतिका नक्षत्रातील प्रवेशामुळे या राशींच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो.
सिंह
सूर्य ग्रहाचे तुमच्या राशीच्या नवव्या आणि दहाव्या घरातून होणारे गोचर अनेक शुभ चिन्हे घेऊन येऊ शकते. या काळात व्यक्तींना विविध क्षेत्रांमध्ये लाभ होईल, जीवनात सुख-शांती वाढेल. कौटुंबिक वेळ चांगला जाईल, धार्मिक तीर्थयात्रा होतील, नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. नवीन नोकरीच्या संधी, पदोन्नती, पगारवाढ, व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो. त्याशिवाय उच्च शिक्षण घेणाऱ्यांची स्वप्ने पूर्ण होऊ शकतात. कुटुंबात शांती आणि आनंद नांदेल. नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी वडील आणि कुटुंबातील इतर सदस्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरू शकते. मनःशांतीदेखील प्राप्त होऊ शकते.
मेष
कृतिका नक्षत्रातील शुक्राचे गोचर या राशीच्या लोकांच्या अनेक क्षेत्रांमध्ये परिणाम करू शकते. तुमच्या राशीच्या कुंडलीत शुक्र ग्रह लग्न आणि द्वितीय स्थानात असेल. त्यामुळे व्यक्तिमत्त्व सुधारू शकते. प्रलंबित कामे पूर्ण होतील, भौतिक सुख-सोई प्राप्त होतील. तुमचे बोलणे आकर्षक असेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या शब्दांनी लोकांना सहज आकर्षित करू शकाल. अडकलेला निधी परत मिळेल, त्यामुळे आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊ शकते. तुम्ही भविष्यासाठी बचतही करू शकता. सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकते. त्याव्यतिरिक्त तुम्हाला परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. तुम्हाला परदेशी कंपनीकडून एक चांगला प्रकल्प मिळू शकतो. हा काळ व्यावसायिकांसाठीही खूप फायदेशीर ठरू शकतो. आयात-निर्यात संबंधित व्यवसायात भरीव नफा होण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. त्याशिवाय वैवाहिक जीवन चांगले राहील.
धनू
शुक्र या राशीच्या पाचव्या आणि सहाव्या घरात गोचर करणार आहे. त्यामुळे तुम्हाला अनेक क्षेत्रांमध्ये लाभ होऊ शकतो. त्याव्यतिरिक्त, शुक्र या राशीत केंद्र-त्रिकोणाबरोबर मालव्य राजयोग तयार करीत आहे, जो शुभ मानला जातो. कृतिका नक्षत्रातील शुक्राच्या उपस्थितीमुळे सर्जनशीलता लक्षणीयरीत्या वाढू शकते आणि नवीन विचार व कल्पनांना चालना मिळू शकते. त्यामुळे करिअरमध्ये लक्षणीय प्रगती होण्याची शक्यताही निर्माण होते. नवीन कल्पना आणि योजनांच्या मदतीने विविध क्षेत्रांमध्ये यश मिळवता येऊ शकते. हा काळ व्यवसायातही फायदेशीर ठरू शकतो. हा काळ प्रेमसंबंधांसाठी सकारात्मक असण्याची शक्यता आहे आणि प्रेमी जीवनात सुधारणा होऊ शकते; पण वैवाहिक जीवनात जोडीदाराबरोबर मतभेद किंवा वाद निर्माण होऊ शकतात.
