Shukra Gochar On 26 March : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्राला राक्षसांचा गुरू, सौंदर्य, आनंद, समृद्धी, विवाह आणि संपत्तीचा घटक मानला जातो. व्यक्तीच्या कुंडलीतील बलवान शुक्र सुखसोयी आणि ऐश्वर्य प्रदान करतो. सध्या, शुक्र मीन राशीत आहे. पण, मार्च महिन्याच्या अखेरीस, २६ तारखेला, शुक्र मेष राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राच्या मेष राशीतील प्रवेशावर १२ राशींचा काही ना काही प्रकारे प्रभाव पडेल. पण, या तीन राशींखाली राशींना विशेष लाभ मिळू शकतो. तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल, तुम्हाला तुमच्या नोकरी किंवा व्यवसायात प्रचंड यश मिळू शकेल. हे विश्लेषण तुमच्या चंद्र राशीवर आधारित आहे.
द्रिक पंचांगानुसार, शुक्र २६ मार्च रोजी सकाळी ५ वाजून १३ मिनिटांनी मेष राशीत प्रवेश करणार आहे आणि १९ एप्रिलपर्यंत तिथेच राहील. या काळात, शुक्र सूर्याबरोबर युती करून शुक्रादित्य योग तयार करणार आहे.
मेष
व्यक्तिमत्व सुधारेल, आकर्षण वाढेल, वैवाहिक जीवन सुखी राहील. शुक्र तुमच्या राशीच्या कुंडलीच्या लग्न स्थानात गोचर करणार आहे, त्यामुळे भौतिक सुखसोयी प्राप्त होतील. नोकरी करणाऱ्यांसाठी शुक्र खूप फायदेशीर ठरू शकतो, परदेश प्रवासाची संधी, परदेशी कंपनीकडून चांगले प्रकल्प , व्यावसायिकांनाही लक्षणीय फायदा, आयात आणि निर्यातीशी संबंधित बाबींमध्ये यश, वैवाहिक जीवन चांगले, वैवाहिक जीवनात आनंद टिकून राहील, जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवू शकता, सुंदर ठिकाणी प्रवास तर शिक्षण क्षेत्रातही फायदा होईल. उच्च शिक्षण घेण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
धनु
तुमच्यासाठी हे गोचर अनुकूल राहील. तुमच्या राशीच्या कुंडलीच्या पाचव्या घरातून शुक्र भ्रमण करणार असून शिक्षण, संतती आणि सर्जनशीलतेशी संबंधित आहे. शिवाय, पाचव्या घरात शुक्राच्या उपस्थितीमुळे केंद्र त्रिकोण योग तयार करेल. परिणामी, या राशीच्या व्यक्तींची वेगाने प्रगती होऊ शकते, ज्यामुळे नवीन कल्पनांचा जन्म होईल, करिअरमध्ये महत्त्वपूर्ण लाभ, नवीन कल्पना, योजनांमुळे अनेक क्षेत्रांमध्ये यश, व्यवसायातही लक्षणीय फायदा, प्रेम जीवनातही लक्षणीय फायदा तर वैवाहिक जीवनाच्या बाबतीत, तुमच्या जोडीदाराबरोबर काही वाद होऊ शकतात. आर्थिक परिस्थिती चांगली राहण्याची शक्यता आहे.
कुंभ
तुमच्या राशीला अनेक क्षेत्रांमध्ये लाभ मिळू शकतो. शुक्र तुमच्या राशीच्या कुंडलीच्या तिसऱ्या घरातून भ्रमण करणार आहे. परिणामी, या राशीच्या व्यक्तींना भाग्याची साथ, नोकरी करणाऱ्या व्यक्तींना अनेक नवीन संधी, करिअरमध्ये लवकर प्रगती, पदोन्नतीसोबतच नवीन जबाबदाऱ्या, व्यवसायात लक्षणीय नफा, नवीन व्यवसाय सुरू करण्याची उत्तम वेळ, आर्थिक लाभ मिळू शकतो. प्रेमाच्या बाबतीत, शुक्र तुमच्या जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट करू शकतो. जोडीदार मोकळेपणाने स्वतःला व्यक्त करू शकतील, नाते अधिक दृढ होईल.
