Shukra Gochar 2026 : वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला सुख, समृद्धी, ऐश्वर्य, सौंदर्य, प्रेम आणि भौतिक सुखांचा कारक मानले जाते. २ सप्टेंबर रोजी शुक्र ग्रह तुळ राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र जेव्हा स्वत:च्या राशीत असतो, तेव्हा तो अत्यंत मजबूत स्थितीत मानला जातो. तब्बल दोन महिने शुक्राची ही अनुकूल स्थिती चार राशींच्या नशिबाला मोठी साथ देणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात या भाग्यवान राशींबद्दल:

१. मेष

मेष राशीच्या लोकांसाठी अनेक शुभ परिणाम मिळण्याची शक्यता आहे. कला आणि क्रिएटीव्हिटी क्षेत्रातील लोकांच्या कौशल्यात सुधारणा होईल. नवीन वस्तू किंवा मालमत्ता खरेदीचे योग येतील. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळून धनलाभाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळू शकते.

२. मिथुन

मिथुन राशीसाठी शुक्र गोचर फलदायी ठरु शकते. हा काळ विद्यार्थ्यांसाठी खूप उत्तम आणि यशाचा ठरेल. कुटुंबात आनंदाचे आणि सौहार्दाचे वातावरण राहील. गुंतवणुकीच्या योजना फायदेशीर ठरतील. पैशांची आवक वाढेल आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील. क्रिएटिव्ह किंवा कलात्मक काम करणाऱ्यांना या काळात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे.

३. सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी शुक्राची ही स्थिती अत्यंत लाभदायक मानली जाते. या काळात एखाद्या खास किंवा प्रभावशाली व्यक्तीशी भेट होऊ शकते. तुम्ही घेतलेल्या प्रत्येक कष्टाला यश मिळेल. कार्यक्षेत्रात प्रगतीचे नवीन रस्ते उघडतील. नोकरी आणि व्यवसायात सकारात्मक बदल आणि मोठे आर्थिक फायदे पाहायला मिळतील.

४. वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुक्र गोचर फायदेशीर ठरु शकते. या काळात घरात एखाद्या नवीन सदस्याचे आगमन किंवा शुभ कार्य घडण्याचे संकेत आहेत. भेटवस्तू मिळण्याचे योग आहेत. तसेच प्रवासाच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील. कोर्ट-कचेरीशी संबंधित प्रकरणांचा निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. वैयक्तिक आयुष्यात आनंददायी बदल घडून येतील.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)