Shukra Maha Gochar 2026 : शुक्रदेवाला प्रेम, सौंदर्य, विवाह, सुख-समृद्धी, कला, वाहन, पैसा आणि नात्यांचा मुख्य कारक मानले जाते. तुळ राशीचा थेट संबंध आयुष्यातील परस्पर समन्वय आणि सहकार्याने पुढे जाण्याशी आहे. स्वराशीत प्रवेश करत असल्यामुळे शुक्रदेव अत्यंत मजबूत स्थितीत असतील. यामुळे नातेसंबंध सुधारणे, नवीन पार्टनरशिप सुरू होणे, कला क्षेत्रात नाव कमावणे आणि मोठा आर्थिक लाभ मिळण्याचे उत्तम योग तयार होत आहेत. मेष, मिथुन, सिंहसह काही राशींच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरेल.

मेष

शुक्राचे गोचर मेष राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरु शकते. हा काळ प्रेम, लग्न आणि व्यावसायिक भागीदारीसाठी उत्तम आहे. विवाहित लोकांच्या नात्यात प्रेम आणि जवळीक वाढेल. व्यापाऱ्यांना नवीन करार आणि मोठ्या ग्राहकांकडून मोठा फायदा होऊ शकतो.

मिथुन

शुक्रदेवाचे गोचर मिथुन राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक बदल घडवून आणू शकतो. हा काळ प्रेमसंबंध, शिक्षण, कला आणि मुलांच्या प्रगतीसाठी अत्यंत फलदायी आहे. कला, लेखन आणि मीडिया क्षेत्रातील लोकांना मान-सन्मान व नवीन संधी मिळतील.

सिंह

शुक्रदेवाचे गोचर सिंह राशीच्या लोकांचा आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि कलात्मकता वाढवेल. मार्केटिंग, सेल्स, मीडिया आणि लेखन क्षेत्रातील लोकांना विशेष लाभ होईल. लहान प्रवासांमधून नवीन संपर्क आणि कामाच्या चांगल्या संधी मिळतील.

तुळ

शुक्रदेवाचे गोचर तुळ राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंदाचे दिवस घेऊन येऊ शकते. या काळात तुमचा व्यक्तिमत्त्व, आत्मविश्वास आणि समाजातील मान-सन्मान वाढेल. प्रेम आणि विवाहाशी संबंधित बाबतीत सकारात्मक प्रतिसाद मिळेल.

धनु

शुक्रदेव तुमच्या अकराव्या स्थानात गोचर करतील. यामुळे तुमचे उत्पन्न, नफा आणि नवीन संपर्कांमधून फायदा होईल. जुन्या इच्छा पूर्ण होतील. व्यापाऱ्यांना नवीन ग्राहक मिळतील आणि व्यवसायात मोठी वाढ दिसून येईल.

कुंभ

शुक्रदेव तुमच्या नवव्या (भाग्य) स्थानात प्रवेश करतील. यामुळे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. उच्च शिक्षण, अध्यात्म आणि लांबच्या प्रवासाचे योग आहेत. परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना किंवा परदेशी जाण्याची इच्छा असणाऱ्यांना चांगल्या बातम्या मिळतील.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)