Premium

लक्ष्मी राजयोग बनल्याने ७२ तासांनी ‘या’ राशी होतील तिप्पट श्रीमंत? शुक्रदेव देणार बक्कळ पैसे व प्रेमाची संधी

Lakshmi Rajyog: वैभवदाता शुक्र देव येत्या ३० मेला संध्याकाळी ७ वाजून २९ मिनिटांनाही कर्क राशीमध्ये गोचर करणार आहे. या काळात मकर राशीत लक्ष्मी राजयोग तयार होत आहे.

Shukra Gochar Made Lakshmi Rajyog In Makar Rashi In Coming 72 hours These Rashi Will Get Crores of Rupees Money Astrology
लक्ष्मी राजयोग बनल्याने ७२ तासांनी 'या' राशी होतील तिप्पट श्रीमंत? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Laxmi Yog In Makar Rashi: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अनेक ग्रह वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतात. या ग्रहांच्या बदलांमुळे १२ राशींच्या भाग्यात मोठ्या उलाढाली होण्याचे संकेत असतात. या महिन्याच्या शेवटाकडे वळताना काही राशींच्या कुंडलीत प्रचंड लाभाची संधी दिसून येत आहे. वैभवदाता शुक्र देव येत्या ३० मेला संध्याकाळी ७ वाजून २९ मिनिटांनाही कर्क राशीमध्ये गोचर करणार आहे. या काळात मकर राशीत लक्ष्मी राजयोग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीत लक्ष्मी योग जुळून आल्याने केवळ मकरच नव्हे तर अन्य काही राशींच्या नशिबाचे दार सुद्धा उघडणार आहे, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या व त्यांना कशाप्रकारचा लाभ होऊ शकतो हे आपण जाणून घेऊया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेष रास (Aries Zodiac)

शुक्र गोचर मेष राशीसाठी अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकते. या काळात तुम्हाला जमीन किंवा गाडीच्या खरेदीचे योग आहेत. नोकरीमध्ये प्रमोशनची चिन्हे दिसत आहेत. या मंडळींना वरिष्ठांच्या मतानुसार वागावे लागू शकते पण काहीवेळा तुम्ही तुमच्या तत्त्वांना सुद्धा महत्त्व द्यायला हवे. आयुष्यात पगारवाढीच्या रूपात धनलाभ होण्याचे योग आहेत, कोणतेही मोठे काम करताना उत्साहाच्या भरात निर्णय घेणे टाळावे.

मिथुन रास (Gemini Zodiac)

मिथुन राशीच्या मंडळींना शुभ कार्यातून आनंद व पैसा असा दुहेरी लाभ होऊ शकतो. धनलाभामुळे आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होऊ शकते. या काळात तुमच्या कुटुंबात एखाद्या विवाहाच्या निमित्ताने नातेवाईकांशी भेट होण्याचा योग आहे. तुमच्या प्रेमाच्या माणसाची साथ लाभू शकते. खर्चात वाढ होऊ शकते त्यामुळे अगोदरच बजेटचे नेटाने पालन करण्याकडे लक्ष द्या.

कर्क रास (Cancer Zodiac)

ज्योतिषशास्त्रानुसार ३० मेला शुक्र कर्क राशीत गोचर करणार आहे आणि या ठिकाणहून मकर राशीत पडणाऱ्या प्रभावानुसार लक्ष्मी राजयोग जुळून येत आहे त्यामुळे येत्या काळात तुम्हाला सुद्धा मोठा धनलाभ होऊ हाकतो. आपल्या व्यक्तिमत्वाला झळाळी मिळू शकते. व्यवसायाच्या नव्या वाटा धुंडाळू शकतात. या काळात तुम्हाला सोन्यातून गुंतवणूकीची संधी आहे.

हे ही वाचा<< सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश घेत ‘या’ ५ राशींच्या भाग्याला देईल झळाळी? ‘या’ रूपात लक्ष्मी बनवू शकते लखपती

मकर रास (Capricorn Zodiac)

शुक्र ग्रहाच्या मकर राशीतील लक्ष्मी राजयोगाचा मोठा प्रभाव हा तुमच्या आर्थिक मिळकतीत होऊ शकतो. अत्यंत अनपेक्षित रूपात तुम्हला लस्कह्मीचा आशीर्वाद मिळू शकतो. गुंतवणुकीवर भर देण्याची खूप गरज आहे. या काळात तुम्ही अनेकांचं मनात घर करून जाऊ शकता. एखाद्या जुन्या कामातून आता फायदा मिळण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-05-2023 at 14:08 IST
Next Story
Chanakya Niti: चाणक्य नीतीनुसार ‘या’ तीन चुकीच्या सवयींमुळे महिला येऊ शकतात अडचणीत, आजच सावध व्हा; नाही तर…