Shukra Gochar 2024: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रहांच्या या परिवर्तनाचा प्रत्येक राशीवर काही ना काही परिणाम होत असतो. शुक्र एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सुमारे एक महिना लागतो. आता धन दाता शुक्र ग्रह जुलै महिन्यात गोचर करणार आहे. येत्या ७ जुलैला शुक्र कर्क राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे काही राशीच्या लोकांचं नशीब उजळू शकणार आहे. शुक्राच्या गोचरमुळे काही लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या लोकांना लाभ होऊ शकतो.

‘या’ राशींचे भाग्य उजळणार?

वृषभ राशी

शुक्राचं गोचर वृषभ राशीसाठी फायदेशीर ठरू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो. या कालावधीत विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे. शुक्राच्या प्रभावामुळे तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पैशाची आवक या काळात वाढण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये तुम्हाला काही अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. अनपेक्षित पैसे मिळू शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा काळ फलदायी ठरु शकते. या काळात कौटुंबिक सदस्यांसोबत तुमचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक घट्ट आणि मजबूत होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shukra gochar march 2024 venus transit in cancer these positive effect on zodiac sign can get huge money pdb