Shukra Gochar: शुक्राच्या बदलत्या चालीचा परिणाम मेष ते मीन अशा एकूण १२ राशींवर होतो. शुक्र सध्या तूळ राशीत असून, आजपासून ६ दिवसांनी म्हणजेच ६ नोव्हेंबर रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहेत. शुक्राचे हे गोचर बुधाच्या राशीत होणार आहे. या राशीत शुक्र १७ दिवस राहणार आहेत. शुक्राने ३ ऑक्टोबरपासून वक्री चाल सुरू केली असून, ते १४ नोव्हेंबरपर्यंत वक्री अवस्थेतच राहणार आहेत.

शुक्राच्या कन्या राशीतील प्रवेशामुळे ४ राशींना सर्वाधिक फायदा होण्याची शक्यता आहे. पंडित नरेंद्र उपाध्याय यांच्या मते, शुक्राच्या या गोचरामुळे ४ राशींच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतात. चला तर जाणून घेऊया, या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत?

पंडितजींच्या मते, शुक्राच्या या बदलामुळे लोकांना पैशांचे योग्य नियोजन करण्याची समज वाढेल. अनावश्यक खर्च टाळून बचतीकडे अधिक लक्ष दिले जाईल. शुक्राचा प्रभाव आर्थिक स्थितीसोबतच नातेसंबंधांवरही दिसून येईल. या गोचरामुळे लोक आपले आयुष्य पुन्हा योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करतील.

कन्या राशीत शुक्र गोचर झाल्याने ‘या’ ४ राशींना होणार फायदा

सिंह राशी

कन्या राशीत शुक्राचे गोचर सुरू होताच सिंह राशीच्या लोकांना त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागतील. आयुष्यात अनेक चांगले बदल घडतील. या काळात धनलाभ होण्याची शक्यता असून आर्थिक परिस्थिती मजबूत झाल्यामुळे मोठा दिलासा मिळेल. या गोचरामुळे योग्य पद्धतीने पैशांची बचत करणे सोपे होईल. अनावश्यक खर्च करण्याची सवय कमी होईल. घरातील सदस्यांसोबत आनंदात वेळ घालवता येईल. गेल्या काही दिवसांत एखाद्या व्यक्तीसोबत मतभेद झाले असतील, तर योग्य वेळी संवाद साधल्यास ते दूर होण्याची शक्यता आहे.

कन्या राशी

शुक्राचे गोचर कन्या राशीतच होणार असल्याने या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. या काळात करिअरमध्ये एखादी चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. स्वतःमधील कौशल्य दाखवण्याची उत्तम संधी मिळेल. व्यक्तिमत्त्वातही चांगला बदल दिसून येईल. बोलण्याची आणि संवाद साधण्याची कला अधिक प्रभावी होईल. व्यवसायात जुन्या ओळखींचा भविष्यात चांगला फायदा होऊ शकतो. आर्थिक परिस्थितीही हळूहळू मनासारखी सुधारत जाईल.

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या लोकांना शुक्राच्या या गोचरामुळे अनेक चांगले बदल अनुभवायला मिळतील. गेल्या काही काळात एखादी गुंतवणूक केली असेल, तर त्याचा फायदा आता मिळण्याची शक्यता आहे. यामुळे रखडलेली कामेही हळूहळू पूर्ण होतील. जुन्या अडचणी दूर होऊ लागतील. खर्च आणि बचत यांच्यात योग्य संतुलन राखता येईल. मन शांत राहील आणि प्रत्येक कामात लक्ष केंद्रित करता येईल.

धनु राशी

धनु राशीच्या लोकांना येत्या काही दिवसांत परिस्थितीत सकारात्मक बदल दिसून येतील. नवीन लोकांशी ओळख होण्याची शक्यता असून या ओळखी भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होण्याचे संकेत आहेत. बऱ्याच दिवसांपासून रखडलेले एखादे काम पूर्ण झाल्यामुळे मन प्रसन्न होईल. नोकरी करणाऱ्यांना दिलासा मिळेल. कामाचा ताण कमी होण्याची शक्यता आहे. विनाकारण होणारा खर्चही थांबेल.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्यातिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)