Shukra Gochar 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा वैभव कारक व प्रेमळ ग्रह मानला जातो. तर फेब्रुवारी हा प्रेमाचा महिना म्हणून जगात प्रसिद्ध आहे. शुक्राच्या गोचरानंतर लगेचच पंच महापुरूषांसह मिळून शुक्र देव मालव्य राजयोग साकारणार आहेत. ज्याच्या प्रभावाने येत्या काळात तीन राशींच्या भाग्याला वेगळीच झळाळी मिळणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचा एक स्वामी असतो. शुक्र हा मीन राशीचा स्वामी आहे, जेव्हा स्वामी ग्रह आपल्या मूळ राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा शुभ प्रभाव तीव्रतेने जाणवू लागतो असे मानले जाते. यानुसार, शुक्राचे मीन राशीत गोचर होताच त्याच्या प्रभावाला दुप्पटीने गती लाभण्याची शक्यता आहे. येत्या ३१ मार्चला पहाटे ४ वाजून ५५ मिनिटांनी शुक्राचे मीन राशीत गोचर पूर्ण होणार आहे त्याच वेळी हा बलाढ्य राजयोग सुद्धा निर्माण होईल. यामुळे प्रभावित राशींच्या मंडळींचे आयुष्य आनंदाने भरून जाईल. धनलाभासह, प्रेम, आरोग्य व करिअर मधील यशाच्या बाबत तुम्हाला हा लाभ अनुभवता येणार का हे पाहूया..

मालव्य राजयोग बनल्याने ‘या’ राशींचे बळ वाढणार; धनलाभासह होईल प्रेमप्राप्ती

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

शनी, शुक्र आणि मंगळाची चांगली साथ मिळाल्याने हाती घेतलेल्या कामांना योग्य गती मिळेल. मेहनतीचे चांगले फळ मिळाल्याने उत्साह वाढेल. विद्यार्थी वर्गाला उच्च शिक्षणासाठी नव्या संधी उपलब्ध होतील. विवाहोत्सुक मंडळींनी प्रयत्न सुरूच ठेवावेत, यश मिळेल. कौटुंबिक समस्या सामोपचाराने सोडवण्याचा प्रयत्न करा. तडकाफडकी निर्णय घेणे योग्य नाही. व्यापारी वर्गाला नव्या लोकांशी जोडले जाण्याची संधी मिळू शकते. प्रेमाच्या बाबत नशीब साथ देईल पण आपल्याला सुद्धा हिंमत दाखवावी लागू शकते. मेष राशीला अन्य ग्रहांचे पाठबळ सुद्धा लाभले आहे त्यामुळे शुक्राच्या मालव्य राजयोगाचा प्रभाव सुरु होताच लाभाचा वेग दुप्पटीने वाढू शकतो.

Shukra Gochar in Mesh
२४ तासांनी ‘या’ ६ राशींच्या नशिबाला मिळेल श्रीमंतीची कलाटणी? शुक्रदेवाच्या कृपेमुळे व्यापारात होऊ शकतो मोठा फायदा
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता

मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)

मकर राशीसाठी मालव्य राजयोग हा लाभदायक सिद्ध होऊ शकतो. संपत्तीच्या बाबत अडथळे दूर होतील. नव्या कामासाठी चांगली संधी उपलब्ध होईल. स्वतःला सिद्ध करू शकाल. विवाहितांचे सहजीवन सुरळीतपणे सुरू राहील. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली प्रथा,परंपरा सांभाळाल. प्रेमविवाहासाठी घरून परवानगी मिळू शकते. सगळ्यांचे मन सांभाळण्याची धडपड तुम्हाला काही सुखाचे क्षण देऊन जाऊ शकते. धनलाभासाठी काही प्रमाणात जोखीम उचलावी लागू शकते पण अत्यंत सावधगिरीने निर्णय घ्यावे. शेअर बाजारातून लाभ संभवतो.

हे ही वाचा<< फेब्रुवारीत ‘या’ तारखांना वाढदिवस असणाऱ्यांचे नशीब फळफळणार; मोठा धनलाभ होताना काय जपावं लागेल?

कर्क रास (Cancer Rashi Bhavishya)

घरी उत्साही वातावरण असेल. स्वतःला जोमाने कामात झोकून द्याल. विद्यार्थी वर्गाला परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने नेटाने अभ्यास, उजळणी आणि सराव करावा लागेल. नोकरी व्यवसायात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चांगले मार्गदर्शन मिळेल. खूप काही शिकायला मिळेल. विवाहोत्सुक मुलामुलींनी जास्त घाई करू नये. विवाहितांना जोडीदाराचा उत्तम पाठिंबा मिळेल. गुंतवणूकदारांच्या पैशाचा चांगला परतावा मिळेल. संयम बाळगावा लागेल. घर, प्रॉपर्टी, मालमत्ता या संबंधित कामात सरकारी पाठबळ मिळेल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)