ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह निश्चित कालावधीत त्यांच्या दुर्बल आणि उच्च राशींमध्ये प्रवेश करतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. धन आणि ऐश्वर्य देणारा शुक्र ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. मीन राशीवर बृहस्पति ग्रहाचे राज्य आहे आणि गुरु ग्रह सध्या तरुण अवस्थेतून फिरत आहे. त्यामुळेच या गोचरचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसणार आहे. परंतु त्यातही अशा काही ३ राशी आहेत ज्यांच्यासाठी शुक्राचा राशी बदल शुभ आणि फलदायी ठरू शकतो. चला जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत.
वृषभ राशी –
वृषभ राशीच्या लोकांसाठी शुक्राचे गोचर शुभ सिद्ध होऊ शकते. कारण, शुक्र ग्रह तुमच्या राशीतून ११ व्या स्थानी जाणार आहे. या ठिकाणी शुक्र बलवान आहे. त्यामुळे जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. यासोबतच व्यापारी वर्गाच्या उत्पन्नातही वाढ होऊ शकते. शेअर मार्केट, बेटिंग आणि लॉटरीमध्ये नफा होऊ शकतो. शिवाय या कालावधीत तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे.
धनु राशी –
शुक्र ग्रहाचे राशी गोचर धनु राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते. कारण या लोकांच्या गोचर कुंडलीत मालव्य आणि हंस नावाचा राजयोग तयार होणार आहे. त्यामुळे या राशीतील लोक मालमत्ता खरेदी करू शकतात. तसेच त्यांना वडिलोपार्जित मालमत्ता मिळू शकते. तर पर्यटन, प्रवास, रिअल इस्टेट, हॉटेल लाइनशी संबंधित लोकांसाठी हा काळ चांगला ठरु शकतो. तसेच, या काळात तुमचे आईसोबतचे नाते अधिक चांगले होईल. कार्यक्षेत्रात कनिष्ठ आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळेल यासोबत प्रमोशन होण्याचीही शक्यता आहे.
हेही वाचा- लक्ष्मी कृपेने होळीपासून ‘या’ राशी होतील श्रीमंत? ‘या’ रुपात मिळू शकते नशिबाला कलाटणी
मिथुन राशी –
मिथुन राशीच्या लोकांसाठी शुक्र राशीचे परिवर्तन फायदेशीर ठरू शकते. कारण तुमच्या गोचर कुंडलीत मालव्य आणि हंस नावाचा राजयोग तयार होणार आहे. त्यामुळे नोकरी व्यवसायातील लोकांचे वेतनवाढ आणि प्रमोशन होण्याची शक्यता आहे. तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळू शकतात. यासोबतच व्यावसायिकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)