scorecardresearch

Premium

चंद्राच्या स्वामी राशीत शुक्रदेव मार्गी! पुढील तीन महिने ‘या’ राशींना बनवतील कोट्याधीश? घरात नांदू शकते सुख-समृध्दी 

शुक्र ग्रहाची हालचाल काही राशींसाठी खूप फायदेशीर ठरु शकते. पाहा तुमची रास आहे का यात…?

Shukra Margi 2023
'या' राशींच्या घरात येऊ शकतो पैसाच पैसा? (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Shukra Margi 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आपली स्थिती बदलतो तेव्हा त्याचा बारा राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम असतो. ग्रहमंडळातील शुक्र हा महत्त्वाच्या ग्रहांपैकी एक आहे. भौतिक सुख, प्रेम प्रकरणात शुक्र ग्रहाची महत्त्वाची भूमिका ठरते. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रह कर्क राशीत ४ सप्टेंबर २०२३ रोजी मार्गी झाले आहेत. शुक्राच्या या थेट हालचालीचा भौतिक सुख, आनंद आणि वैवाहिक जीवनात तीन राशींना जबरदस्त फायदा होऊ शकतो. जाणून घेऊया कोणकोणत्या राशींवर शुक्र ग्रहाचा शुभ प्रभाव पडू शकतो.

‘या’ राशींचा भाग्योदयाचा काळ?

मिथुन राशी

शुक्राच्या हालचालीमुळे या राशीतील मंडळीचा प्रगतीचा मार्ग मोकळा होऊ शकतो. अनेक दिवसांपासून सुरू असलेले वाद-विवाद दूर होऊ शकतात. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभाची संधी मिळू शकते. व्यावसायिकांसाठी हा काळ विशेषतः शुभ ठरु शकतो. या काळात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

2023 These Four Rashi Get Lakshmi Blessing With Shani Margi Guru Chandal Yog Finishing You Can Earn Huge Money Too
२०२४ मध्ये शनी मार्गी व गुरु-चांडाळ योग ‘या’ राशींच्या प्रगतीचा वेग वाढवणार! नवीन वर्षात मिळेल लक्ष्मीकृपा
Surya Budh Yuti 2023
१७ ऑक्टोबरपर्यंत ‘या’ चार राशींना होणार अपार धनलाभ? सूर्य-बुधदेवाच्या युतीने होऊ शकते उत्पन्नात प्रचंड वाढ
rangoli designs of ganpati video
VIDEO : गणेशोत्सवादरम्यान काढा एकापेक्षा एक भारी गणपतीच्या रांगोळ्या, एकदा व्हिडीओ पाहाच..
Budh Margi 2023 in Singh
पुढील २० दिवस ‘या’ राशींवर बाप्पांची कृपा? बुधदेव मार्गी झाल्याने माता लक्ष्मीच्या कृपेने घरात येऊ शकतो प्रचंड पैसा

(हे ही वाचा : ११ ऑक्टोबरपासून कन्यासह ‘या’ राशींचे अच्छे दिन सुरु? बुधादित्य राजयोग बनल्याने होऊ शकताे अपार धनलाभ )

कन्या राशी

ज्योतिष शास्त्रानुसार कन्या राशीच्या लोकांना शुक्राच्या प्रत्यक्ष हालचालीमुळे विशेष फळ मिळू शकतो. या राशीतील लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात नोकरीत बदल होऊ शकतो. उच्च पद मिळू शकते. कुटुंबातील सदस्याकडून पैसे मिळू शकतात.

तूळ राशी

ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशीच्या लोकांना शुक्र प्रत्यक्ष असल्यामुळे अनुकूल परिणाम मिळू शकतात. या काळात उत्पन्नात वाढ होण्याची चिन्हे आहेत. बँक बॅलन्स वाढू शकतो. व्यवसायात तेजी येऊ शकते. जुनाट आजारांपासूनही आराम मिळू शकतो. या काळात नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shukra gochar venus planet margi in cancer these these three zodic signs bank balance to raise money marathi astrology pdb

First published on: 14-09-2023 at 12:29 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×