scorecardresearch

महाशिवरात्रीनंतर ‘या’ राशी होणार श्रीमंत? शुक्राच्या प्रवेशाने मिळणार प्रचंड धनलाभाची संधी

Shukra Gochar In Meen: पंचांगानुसार वैभवाचा दाता शुक्र आपल्या उच्च राशीत मीन राशीत प्रवेश करणार आहे. ज्यामुळे ३ राशीच्या लोकांची सुरुवात चांगली होऊ शकते.

mahashivratri 2023
फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम'

Shukra Gochar In Meen: वैदिक ज्योतिषानुसार, ग्रह वेळोवेळी त्यांच्या दुर्बल आणि उच्च राशीत प्रवेश करतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि देश-विश्वावर होतो. धन आणि वैभव देणारा शुक्र मीन राशीत प्रवेश करणार आहे (Venus Transit In Pisces). ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसेल. परंतु अशा ३ राशी आहेत ज्यांच्यासाठी शुक्राचे संक्रमण फायदेशीर सिद्ध होऊ शकते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

कन्या राशी

शुक्राचे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण हे संक्रमण तुमच्या राशीतून सातव्या घरात होणार आहे. जे वैवाहिक जीवन आणि भागीदारीचे ठिकाण मानले जाते. म्हणूनच यावेळी तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या मदतीने पैसे मिळू शकतात. यासोबतच तुमचे तुमच्या जोडीदारासोबतचे नातेही चांगले होईल. राजकारणाशी संबंधित असलेल्या लोकांना काही पद मिळू शकते. तसेच, या काळात तुम्हाला भागीदारीच्या कामात प्रचंड लाभ मिळू शकतो. दुसरीकडे शुक्राचे संक्रमण तुमच्या राशीत मालव्य राज योग तयार करेल. यामुळे तुम्हाला अचानक पैसेही मिळू शकतात.

वृषभ राशी

शुक्राचा राशी बदल वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीतून उत्पन्नाच्या घरात प्रवेश करेल. त्यामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. यासोबतच व्यापाऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होऊ शकते. तसेच यावेळी तुमचा व्यवसाय भरभराटीस येईल. तुम्हाला व्यवसायात नवीन संधी मिळतील आणि यावेळी तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. दुसरीकडे, ज्यांना स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे आहेत त्यांना यश मिळण्याची शक्यता आहे.

( हे ही वाचा: २० वर्षांनंतर तयार होणार ४ ‘धन राजयोग’; ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, मिळू शकतो अपार पैसा)

कुंभ राशी

शुक्राचा राशी बदल तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी ठरू शकतो. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीतून धनाच्या घरात प्रवेश करणार आहे. यामुळे तुम्हाला यावेळी अचानक धनलाभाचे योग मिळत आहेत. यासोबतच व्यापारी वर्गासाठीही काळ चांगला जाणार आहे. कमी खर्चात जास्त नफा मिळू शकतो. तुमच्या बोलण्याने लोकांची मने जिंकण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तसेच, या काळात अडकलेले पैसे मिळू शकतात.

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 09:48 IST