Labh Drishti Yog August 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला सुख, ऐश्वर्य, प्रेम, सौंदर्य आणि धनाचा कारक मानले जाते. तर देवगुरु बृहस्पति हा ज्ञान, धर्म, भाग्य, समृद्धी आणि नैतिकतेचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे या दोन्ही शुभ ग्रहांचा विशेष योग निर्माण झाल्यास त्याचा प्रभाव काही राशींच्या जीवनावर सकारात्मक पडू शकतो.
ज्योतिषशास्त्रानुसार, १७ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९ वाजून ४३ मिनिटांनी शुक्र आणि गुरु एकमेकांपासून ६० अंशांवर येणार असून ‘लाभ दृष्टि योग’ तयार होणार आहे. हा योग काही काळासाठी सक्रिय राहणार आहे. या काळात काही राशींच्या लोकांना आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि प्रेमसंबंधांमध्ये सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतात.
तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान ४ राशी…
वृषभ राशी- आर्थिक अडचणी दूर होण्याची शक्यता
वृषभ राशीच्या लोकांसाठी लाभ दृष्टि योग विशेष शुभ ठरू शकतो. प्रेमसंबंधांमध्ये सुरू असलेले गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरणही आनंदी राहू शकते. नोकरी-व्यवसायात सकारात्मक बदल घडून येतील. आर्थिक बाबतीत सुरू असलेल्या अडचणी दूर होण्याची शक्यता असून उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. बचतीकडेही लक्ष देता येईल. अचानक एखादा आर्थिक फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तूळ राशी- मोठ्या आर्थिक लाभाचे संकेत
तुला राशीसाठी शुक्र-गुरुचा हा योग आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे सहकार्य मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये जवळीक आणि विश्वास वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी हा काळ विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. मोठ्या व्यावसायिक डील किंवा नवीन संधी मिळण्याचे संकेत आहेत. आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे.
धनु राशी- करिअरमध्ये वेग, व्यवसायात मोठे निर्णय
धनु राशीच्या लोकांना लाभ दृष्टि योगामुळे नशिबाची साथ मिळू शकते. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल. जुन्या मित्राची भेट किंवा त्याच्याकडून महत्त्वाची मदत मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगतीचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही हा काळ महत्त्वाचा असून मोठे निर्णय घेण्याची संधी मिळू शकते.
मीन राशी- अनेक मार्गांनी पैसा येण्याची शक्यता
मीन राशीच्या लोकांसाठीही हा योग शुभ परिणाम देऊ शकतो. प्रेमसंबंध अधिक मजबूत होण्याची शक्यता असून वैवाहिक जीवनात परस्पर समजूतदारपणा वाढेल. दीर्घकाळापासून मनात असलेली एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. करिअरच्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. व्यवसायात नवीन बदल किंवा विस्ताराची संधी मिळू शकते. उत्पन्नाचे अनेक स्रोत निर्माण होण्याची शक्यता असून आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते.
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
