Shukra-Guru Dwidwadash Yog 2026: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला सौंदर्य, आकर्षण, धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते. तर गुरू ग्रहाला ज्ञान, सौभाग्य आणि सुख-समृद्धीचा कारक ग्रह मानले जाते.

पंचांगानुसार, १२ जुलै २०२६ रोजी पहाटे ०५ वाजून ५३ मिनिटांनी शुक्र आणि गुरू द्विद्वादश दृष्टी योग निर्माण करत आहेत. या योगाला ज्योतिषशास्त्रामध्ये अत्यंत खास आणि लाभदायक मानले जाते. खरंतर, जेव्हा दोन ग्रहा एकमेकांपासून ३० डिग्री अंतरावर स्थित असतात, तेव्हा हा शुभ राजयोग निर्माण होतो. या योगाच्या शुभ प्रभावाने व्यक्तीला मानसन्मान, पैसा अन् प्रसिद्धी मिळते.

शुक्र-गुरूचा ‘द्विद्वादश दृष्टी योग’ बदलणार ‘या’ राशींचे भाग्य

वृषभ (Vruschik Rashi)

शुक्र-गुरूचा दृष्टी योग वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. स्पर्धा परिक्षेत मनासारखे यश मिळवता येईल.

मीन (Meen Rashi)

मीन राशीच्या व्यक्तींसाठी शुक्र-गुरूचा दृष्टी योग खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. नवीन लोक भेटतील, अविवाहितांचे लग्न जुळेल. मनासारखा जोडीदार मिळेल.

धनु (Dhanu Rashi)

शुक्र-गुरूचा दृष्टी योगामुळे धनु राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त होईल. मनातील इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील.

मिथुन (Mithun Rashi)

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी शुक्र-गुरूचा दृष्टी योग अनुकूल ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)