Shukra In Kanya Gochar 2026: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशीपरिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते. पंचांगानुसार, दैत्यगुरू शुक्र सध्या कन्या राशीत विराजमान असून शुक्र कन्या राशीत नीच स्थिती असतो. लवकरच शुक्र या स्थितीतून बाहेर येणार आहे. पंचांगानुसार, शुक्र ०२ सप्टेंबर २०२६ रोजी ०१ वाजून ५१ मिनिटांनी कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र नीच स्थितीतून बाहेर येताच हे गोचर काही राशींसाठी लाभदायी सिद्ध होईल.
शुक्र ग्रह ‘या’ राशींचे भाग्य बदलणार
वृषभ (Vrushabh Rashi)
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे हे राशी परिवर्तन खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळू शकतात. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. घरातील वातावरण आनंदी राहण्याची शक्यता असून भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकते.
तूळ (Tula Rashi)
शुक्राचे राशी परिवर्तन तूळ राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. आत्मविश्वास वाढेल आणि व्यक्तिमत्त्वात आकर्षण निर्माण होईल. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात, तर व्यवसायात आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. प्रेम, नातेसंबंध आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या बाबतीतही चांगले परिणाम मिळू शकतात.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
