Shukra In Mithun Rashi 2026: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते. पंचांगानुसार, १४ मे २०२६ मध्ये सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी शुक्र ग्रहाचा मिथुन राशीत प्रवेश होणार असून शुक्र ०८ जून २०२६ रोजी संध्याकाळी ०५ वाजून ४७ मिनिटांपर्यंत विराजमान असेल. ज्याचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पडू शकतो.

शुक्राचे गोचर या राशींना मालामाल करणार

वृषभ (Vrushabh Rashi)

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे राशी परिवर्तन अनुकूल ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.

कर्क (Kark Rashi)

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे राशी परिवर्तन खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. पगारवाढ होईल व उच्च पद देखील मिळू शकते.

कन्या (Kanya Rashi)

शुक्राचे राशी परिवर्तन कन्या राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्यांना उत्तम यश मिळेल.

मीन (Meen Rashi)

मीन राशींच्या लोकांसाठी शुक्राचे गोचर अनुकूल सिद्ध होईल. या काळात मनासारख्या गोष्टी करायला मिळतील. तीर्थक्षेत्रांना भेट देण्याचे प्रबळ योग जुळून येतील. अशक्य गोष्टी शक्य होतील. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. या काळात तुमच्या आयुष्यातील अनेक चांगल्या गोष्टी घडतील. अविवाहितांचे लग्न जुळेल, प्रेमसंबंध अधीर मजबूत आणि मधुर होतील. कामातील अडथळे दूर होऊन करिअरमध्ये प्रचंड यश मिळेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)