Shukra In Vrushabh Rashi : भविष्य पंचांगानुसार, १९ एप्रिल २०२६ रोजी, धन, समृद्धीचा ग्रह शुक्र, स्वतःच्या राशीत म्हणजेच वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राचे स्वतःच्या राशीतील संक्रमण अत्यंत शुभ मानले जाते. कारण या प्रवेशामुळे मालव्य महापुरुष राजयोग निर्माण होणार आहे. हा राजयोग प्रमुख पंचमहापुरुष योगांपैकी एक असून, तो भौतिक सुख, धन, प्रतिष्ठा आणि ऐश्वर्य प्रदान करतो. पण, मालव्य महापुरुष राजयोगाचे प्रभाव सर्व राशींच्या लोकांना जाणवू शकतात. वृषभ, सिंह आणि कन्या राशीच्या मंडळींसाठी तुम्हाला सकारात्मक ठरू शकते. या व्यक्तींना त्यांच्या करिअर, व्यवसायात प्रगती अनुभवण्याची शक्यता आहे.
मालव्य महापुरुष राजयोग म्हणजे काय?
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार…
मालव्य राजयोग पुढील गोष्टींमुळे तयार होतो…
१. जेव्हा शुक्र ग्रह कुंडलीतील केंद्रस्थानी (१, ४, ७, किंवा १०)
२. स्वतःच्या राशीत (वृषभ किंवा तूळ) किंवा उच्च राशीत (मीन) असतो
३. गोचरात (Transit) सुद्धा जर शुक्र अशा स्थितीत आला,
तरी काही काळासाठी हा योग प्रभाव देऊ शकतो. त्यामुळे हा योग आकर्षक व्यक्तिमत्त्व, ऐश्वर्य, कलांमध्ये रुची, आर्थिक समृद्धी आणि सामाजिक प्रतिष्ठा प्रदान करतो. ज्यांच्या कुंडलीत हा योग बलवान असतो, त्यांना भरपूर भौतिक सुखसोयी मिळतात आणि ते समाजात प्रभावशाली पदे प्राप्त करतात.
या राशींवर होईल सकारात्मक परिणाम…
वृषभ
शुक्र ग्रह तुमच्या राशीत गोचर करत असल्यामुळे, आत्मविश्वास वाढेल, आदर आणि सन्मानही मिळू शकतो. सुखी वैवाहिक जीवनाची चिन्हे दिसत आहे. या काळात तुम्ही थोडे रोमँटिक होऊ शकता. अविवाहित लोकांचे विवाह जुळू शकतात. नवीन करिअरच्या संधी, पदोन्नती किंवा पगारवाढीची शक्यता आहे. व्यावसायिकांना मोठा नफा मिळू शकतो. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे, तुमच्या सुखसोयीमध्ये वाढ होईल. त्यामुळे तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करू शकता.
सिंह
हा राजयोग तुमच्या करिअर आणि व्यवसायासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. राजयोग कुंडलीच्या कर्म भावामध्ये तयार होत असल्यामुळे या काळात पदोन्नती, नवीन जबाबदाऱ्या, सन्मान मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या विस्ताराच्या संधी, वरिष्ठांकडून पाठिंबा आणि तुमचा सामाजिक दर्जा वाढू शकतो. कला, फॅशन डिझायनिंग, संगीत आणि मॉडेलिंग या क्षेत्रांतील व्यक्तींना लक्षणीय लाभ मिळू शकतो. पण, या काळात तुम्हाला थोडे अधिक कष्ट करावे लागू शकतात.
कन्या
हा राजयोग तुमच्या राशीतील भाग्य स्थानात तयार होत आहे. त्यामुळे, तुम्हाला फायदा होऊ शकतो. या काळात परदेशाशी संबंधित कामांमध्ये यश मिळू शकते. नोकरी बदलण्यासाठी, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील हा चांगला काळ असू शकतो. पण, करिअरमध्ये बदल करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. व्यावसायिकांसाठी, व्यवसायातील गुंतवणूक फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. पण, तज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच गुंतवणूक करणे उत्तम ठरेल. या काळात तुम्ही कामाच्या निमित्ताने प्रवास देखील करू शकता.
