Kendra Yog 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा दोन ग्रह अंदाजे ९० अंशांच्या अंतरावर असतात, तेव्हा केंद्र योग तयार होतो. हा योग बदल आणि प्रगतीसाठी एक महत्त्वपूर्ण योग मानला जातो. यामुळे करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतात, उत्पन्न वाढते आणि रखडलेली कामे पूर्ण होतात. अनेक व्यक्तींना, त्यांच्या कुंडलीतील अनुकूल परिस्थितीनुसार, नवीन जबाबदाऱ्या, चांगली ओळख आणि आर्थिक लाभ मिळतात.

पंचांगानुसार, २९ जुलै २०२६ रोजी अंतिम ‘केंद्र योग’ तयार होत आहे, जो शुक्र आणि मंगळ ग्रहांनी मिळून बनवला आहे. हा शुभ शुक्र-मंगळ योग नवीन भागीदारी, नवीन संपर्क आणि प्रभावशाली लोकांकडून पाठिंबा मिळवून देऊ शकतो. या दोन ग्रहांच्या प्रभावामुळे संपत्ती, वाहने आणि इतर ऐश्वर्यपूर्ण वस्तूंमध्येही वाढ होऊ शकते.

‘केंद्र योग’ भाग्य उजळणार

वृषभ (Vrushabh Rashi)

‘केंद्र योग’ वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. या काळात नोकरीत हवे तसे यश मिळवाल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात आई-वडील आणि तुमच्या गुरूंचा आर्शीवाद तुमच्या पाठीशी असेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकार्यांकडून मदत मिळेल. अचानक धनलाभ होईल. शत्रूंवर विजय मिळवाल.

सिंह (Singh Rashi)

‘केंद्र योग’ सिंह राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल. तुम्हाला कुटुंबात काही चांगली बातमी मिळू शकते.

तूळ (Tula Rashi)

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा योग अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. त्यामुळे अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आकस्मिक धनलाभ होईल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात आई-वडील आणि तुमच्या गुरूंचा आर्शीवाद तुमच्या पाठीशी असेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकार्यांकडून मदत मिळेल. प्रत्येक निर्णयात तुम्हाला तुमच्या जीवनसाथीकडून पाठिंबा मिळेल.

धनु (Dhanu Rashi)

शुक्र-मंगळाचा हा योग धनु राशीच्या व्यक्तींसाठी या काळात अचानक धनलाभ होईल. वैवाहिक जीवन सुखमय होईल. आयुष्यात सुख-शांती निर्माण होईल. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. पद-प्रतिष्ठेत वाढ होईल. जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध अधिक गोड होतील. जुने वाद मिटू शकतात. मानसिक ताण कमी होईल. येणारा काळ तुमच्यासाठी नवीन यशाचे मार्ग खुले करू शकतो. घर किंवा वाहनाशी संबंधित योजना पुढे जाऊ शकतात.

मकर (Makar Rashi)

मकर राशीच्या लोकांसाठी हा योग अतिशय लाभदायी सिद्ध होईल. ही शुक्र-मंगळ युती मकर राशीला कष्टाचे फळ मिळवून देऊ शकते. करिअरमध्ये स्थिरता वाढेल. तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. टीममधील तुमची भूमिका अधिक मजबूत होईल. व्यवसायात नफा वाढण्याची दाट शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. पैशाचा ओघ पूर्वीपेक्षा खूप चांगला राहील.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)