Shukra Mangal Yuddh 2026: शुक्र धनु राशीत भ्रमण करत आहे. मंगळ देखील धनु राशीत आहे. ६ जानेवारी २०२६ रोजी हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या खूप जवळ येतील, त्यामुळे शुक्र आणि मंगळ यांच्यात युद्ध सुरू होईल. शुक्र आणि मंगळ हे एकमेकांचे शत्रू आहेत. त्यामुळे या दोन्ही ग्रहांच्या जवळीकतेला शुक्र-मंगळ युद्ध असे म्हटले जाते. या ग्रहांमधील हा संघर्ष ६ जानेवारीच्या सकाळी सुरू होईल आणि १० जानेवारीच्या सकाळी संपेल. असं असताना हे चार दिवस चार राशींसाठी प्रामुख्याने खूप अवघड असतील.

मेष राशी

मेष राशीसाठी मंगळ-शुक्र संघर्षामुळे ताण, राग आणि चिडचिड वाढू शकते. कामाच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता आहे. या काळात संघर्ष टाळणे उत्तम ठरेल. महत्त्वाचे निर्णय घेणे टाळा. निद्रानाश आणि आरोग्य समस्या संभवतात. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

वृषभ राशी

हा काळ वृषभ राशीसाठी तणाव आणि अशांतता आणू शकतो. काही लकांची आर्थिक परिस्थिती डळमळीत असू शकते. तुमचा राग नियंत्रित करा. कोण तुमच्यावर टीका केली तरी शांतपणे ऐका. ध्यान, सजगता आणि योगाचा सराव करा. मनोरंजनासाठी वेळ काढा.

तूळ राशी

तूळ राशीच्या लोकांनीही या चार दिवसांत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. एखाद्याशी वाद होण्याची शक्यता आहे. तुम्ही भावनिकदृष्ट्या अस्वस्थ व्हाल. कायदेशीर कार्यवाही काळजीपूर्वक हाताळा. घर आणि कामाचे संतुलन राखणे कठीण होईल. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. झोप आणि विश्रांतीसाठी वेळ काढा.

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या लोकांना ताण आणि चिंता त्रास देऊ शकतात. तुम्हाला मानसिकदृष्ट्या थकवा जाणवेल. वादविवाद आणि संघर्षांपासून दूर राहा, नाहीतर तुम्ही अडचणीत येऊ शकता. निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याचा प्रयत्न करा.