Shukra-Mangal Yuti 2026: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचे महत्व आहे. प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशीपरिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते. तर मंगळ ग्रहाला ऊर्जा, साहस आणि आत्मविश्वासाचा कारक ग्रह मानले जाते. जेव्हा या दोन्ही ग्रहांची युती निर्माण होते तेव्हा व्यक्तीमध्ये आकर्षण, आत्मविश्वास निर्माण होतो.
पंचांगानुसार, शुक्र ग्रह ०६ फेब्रुवारी २०२६ रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार असून २३ फेब्रुवारी २०२६ रोजी मंगळ ग्रह कुंभ राशीत प्रवेश करेल. शुक्र-मंगळाची ही युती १२ राशींच्या व्यक्तींवर विशेष प्रभाव पाहायला मिळेल.
शुक्र-मंगळ ‘या’ राशींचे आयुष्य बदलणार
वृश्चिक (Vruschik Rashi)
वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी शुक्र-मंगळाची युती खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा.
मकर (Makar Rashi)
मकर राशीच्या व्यक्तींसाठी शुक्र-मंगळाची युती अनुकूल ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.
तूळ (Tula Rashi)
शुक्र-मंगळाची युती तूळ राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा.
मिथुन (Mithun Rashi)
हा युती मिथुन राशीसाठी अत्यंत शुभ ठरू शकतो. या राशीचे लोक करिअरमध्ये भाग्यवान ठरु शकतात. पदोन्नतीत विशेष लाभ मिळू शकतो. तुम्हाला परदेशात काम करण्याची संधीही मिळू शकते. व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. व्यवसायात प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

