Shukra Margi 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रहाला राक्षसांचा गुरू तसेच सुख, समृद्धी, संपत्ती, विलास, आकर्षण, प्रेम इत्यादींचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे शुक्राच्या राशी किंवा नक्षत्रबदलाचा प्रत्येक क्षेत्रावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या प्रभाव पडतो. सध्या शुक्र मीन राशीत वक्री स्थितीत आहे. शुक्र १३ एप्रिल रोजी मीन राशीत मार्गी होत आहे. शुक्र मीन राशीत येताच १२ पैकी काही राशींचे नशीब पालटू शकते. त्यांना नोकरी-व्यवसायात यशासह खूप मोठे फायदे मिळू शकतात. चला जाणून घेऊ या भाग्यशाली राशींविषयी..
ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रह १३ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजून ३१ मिनिटांनी मीन राशीत मार्गी होत आहे.
शुक्राच्या राशिबदलाचा ‘या’ राशींना मिळेल फायदा
वृषभ (Taurus)
शुक्राचा राशिबदल वृषभ राशीसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात वृषभ राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश मिळू शकते. त्यांना आर्थिक लाभदेखील मिळू शकतो. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. प्रत्येक कामात यश मिळू शकेल. कुटुंबासह तुमचा वेळ चांगला जाईल. तसेच या काळात तुमची नव्या लोकांसह मैत्री होऊ शकते. व्यवसायातही तुम्हाला नफा मिळेल.
धनू (Sagittarius)
शुक्राचा राशिबदल धनू राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. या राशीच्या लोकांसाठी यशाचा मार्ग खुला होईल. तुमची बऱ्याच काळापासून रखडलेली काम पुन्हा सुरू होऊ शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांसाठीही हा काळ खूप फायदेशीर ठरू शकतो. नोकरदारांच्या समस्या आता संपू शकतात. त्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही तुम्हाला सहकार्य मिळू शकते. कुटुंबातील ताण थोडा कमी होऊ शकतो. तुम्हाला जमीन, इमारत, वाहन इत्यादींमधूनही फायदा होऊ शकतो.
कुंभ (Aquarius)
शुक्राचा राशिबदल कुंभ राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरू शकतो. या काळात कुंभ राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात भरपूर यश मिळू शकते. तुम्हाला या काळात नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. नोकरदारांचा कामाच्या ठिकाणी चांगला वेळ जाऊ शकेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचे चांगले संबंध असू शकतात. त्यासह नोकरदारांना पदोन्नतीसह पगारात वाढदेखील मिळू शकते. वाहन, जमीन इत्यादी खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. मानसिक आणि शारीरिक समस्यांपासून आराम मिळू शकेल.