Shukra Gochar 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र हा प्रेम, सौंदर्य, संपत्ती, समृद्धी आणि आनंदाचा ग्रह आहे. ८ मे २०२६ रोजी रात्री ९ वाजून ५१ मिनिटांनी शुक्र मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करेल. मंगळाच्या अधिपत्याखालील मृगशिरा नक्षत्रातील शुक्राचे गोचर २० मे पर्यंत सुरू राहील. शुक्राचे हे गोचर काही विशिष्ट राशींसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. मृगशिरा नक्षत्रातील शुक्राच्या गोचरामुळे चार राशींच्या व्यक्तींना अधिक सुख लाभेल. त्यांना मोठे यश आणि पैसे कमावण्याचे अनेक मार्ग खुले होतील.

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांसाठी शुक्राचा नक्षत्रातील बदल शुभ ठरू शकतो. हा आत्मपरीक्षणाचा काळ आहे. गुप्त उत्पन्नामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. जुन्या गुंतवणुकीतून मोठा नफा मिळू शकतो. मानसिक तणाव कमी होईल. तुम्ही गाडी खरेदी करण्याचा विचार करू शकता.

मिथुन राशी

शुक्राचे हे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरेल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील आणि त्यांना करिअरमध्येही प्रगती साधता येईल. व्यवसायात लक्षणीय नफा होण्याची शक्यता आहे. अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्तावही येऊ शकतात. क्रिएटिव्हिटी वाढेल.

कर्क राशी

शुक्राचे हे संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी प्रभावी ठरेल. उत्पन्नाचे अनेक मार्ग खुले होतील आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. मित्र तुम्हाला पाठिंबा देतील आणि संवाद सुधारेल. तुम्हाला नवीन लोकांना भेटण्याच्या अनेक संधी मिळू शकतील. तुमचे प्रेमजीवन अधिक सकारात्मक होईल.

तूळ राशी

शुक्राचा मंगळ नक्षत्रातील प्रवेश तूळ राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकतो. त्यांचे सौंदर्य वाढू शकते. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील आणि वैवाहिक सुखात वाढ होईल. आर्थिक सुबत्ता मजबूत होईल. अनावश्यक खर्च टाळा.