Shukra Nakshatra Gochar 2026: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते. पंचांगानुसार, शुक्र १६ जुलै २०२६ रोजी संध्याकाळी ०७ वाजून ११ मिनिटांनी पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात गोचर करेल. शुक्र ग्रहाचे हे गोचर १२ पैकी काही राशींच्या लोकांसाठी अतिशय लाभदायी सिद्ध होईल.

शुक्र ग्रहाचे गोचर ‘या’ राशींचे भाग्य बदलणार

मेष (Mesh Rashi)

मेष राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे नक्षत्र परिवर्तन अनुकूल ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील.अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल.

सिंह (Singh Rashi)

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे राशी परिवर्तन खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा.

तूळ (Tula Rashi)

शुक्राचे नक्षत्र परिवर्तन तूळ राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा.

धनु (Dhanu Rashi)

शुक्राचे नक्षत्र परिवर्तन धनु राशीच्या व्यक्तींना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील, आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील.नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल. तुमच्या भावडांबरोबर चांगले क्षण व्यतीत कराल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)