Shukra Nakshatra Gochar 2026: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशीपरिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते. पंचांगानुसार, दैत्यगुरू शुक्र ३१ मे २०२६ रोजी पहाटे ०५ वाजून ५२ मिनिटांनी पुनर्वसु नक्षत्राच्या प्रवेश करणार आहेत. या नक्षत्रात तो ११ जूनपर्यंत असेल. या नक्षत्राचा स्वामी गुरू ग्रह असून हे नक्षत्र परिवर्तन काही राशींना खूप लाभदायक सिद्ध होईल.

शुक्राचे नक्षत्र गोचर ‘या’ राशींचे भाग्य चमकवणार

कर्क (Kark Rashi)

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे परिवर्तन अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल.

कन्या (Kanya Rashi)

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राच्या परिवर्तनाचे अनेक लाभकारी परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबातील वाद मिटतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरी-व्यवसायात पदोन्नती होईल. आकस्मिक धनलाभ होईल. कुटुंबातील जुने वाद मिटतील, आनंदाचे वातावरण असेल. कामच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता.

मेष (Mesh Rashi)

मेष राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे परिवर्तन खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा.

सिंह (Singh Rashi)

सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ लाभप्रद ठरू शकतो. या काळात भाग्याचा साथ मिळेल. या काळात देश-विदेश प्रवास करण्याची संधी येईल आणि ते शुभ राहतील. धर्म-कर्माच्या कार्यांमध्ये रस वाढेल. जे लोक व्यवसायात अडचणीत आहेत, त्यांना आकस्मिक धनलाभ होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये स्थिरता असल्याने नोकरदार लोक आनंदी राहतील. तसेच, इच्छांची पूर्तता होईल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)