Shukra Gochar 2026: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते. पंचांगानुसार, दैत्यगुरू शुक्र सध्या मिथुन राशीत असून तो ०८ जून २०२६ रोजी चंद्राचे स्वामित्व असलेल्या कर्क राशीत प्रवेश करेल. या राशीत शुक्र ०४ जुलै २०२६ पर्यंत राहील. त्यानंतर तो सिंह राशीत प्रवेश करेल. शुक्राचे हे गोचर नक्कीच १२ पैकी काही राशींच्या लोकांसाठी लाभदायी सिद्ध होईल.
शुक्राचे गोचर ‘या’ राशींचे नशीब बदलणार
वृषभ (Vrushabh Rashi)
वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे गोचर खूप फायदेशीर ठरेल. आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होईल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल.
कुंभ (Kumbha Rashi)
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे गोचर अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. या काळात नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल.अविवाहितांचे लग्न जुळेल, मनासारखा जोडीदार भेटेल. नोकरी-व्यवसायात भरभराट होईल.
धनु (Dhanu Rashi)
धनु राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे गोचर अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. धार्मिक कार्यात मन रमेल. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
