Shukra Nakshatra Gochar 2026: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते.शुक्र सध्या मृगशिरा नक्षत्रात गोचर करत आहे. यानंतर, शुक्र आर्द्रा नक्षत्रात गोचर करेल. राहू ग्रहाला आर्द्रा नक्षत्राचा स्वामी मानला जातो. राहू नक्षत्रातील शुक्राचे गोचर अनेक राशींसाठी फायदेशीर ठरेल.
पंचांगानुसार, शुक्र २० मे २०२६ रोजी दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांनी आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करेल. शुक्र गोचराच्या प्रभावाखाली, तीन राशींना त्यांच्या करिअर आणि व्यवसायात आर्थिक लाभ मिळेल. आर्थिकदृष्ट्या काळ चांगला राहील. या राशींच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील.
शुक्राचे गोचर ‘या’ राशींना गडगंज श्रीमंती देणार
वृषभ (Vrushanbh Rashi)
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचा राहूच्या नक्षत्रातील प्रवेश लाभदायी ठरेल. या काळात आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.
कुंभ (Kumbha Rashi)
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचा राहूच्या नक्षत्रातील प्रवेश अनेक लाभकारी परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबातील वाद मिटतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कामच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरी-व्यवसायात पदोन्नती होईल. आकस्मिक धनलाभ होईल. कुटुंबातील जुने वाद मिटतील, आनंदाचे वातावरण असेल.
मिथुन (Mithun Rashi)
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी राहूच्या नक्षत्रातील प्रवेश खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
