Shukra Gochar In Kritika Nakshatra 2026: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, संपत्ती आणि सुखी वैवाहिक जीवन, भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते. पंचांगानुसार, दैत्यगुरू शुक्र १६ एप्रिल २०२६ रोजी रात्री १० वाजून १९ मिनिटांनी सूर्याच्या कृतिका नक्षत्रात प्रवेश करेल. हे नक्षत्र परिवर्तन काही राशींना खूप लाभदायक सिद्ध होईल.
शुक्राचे नक्षत्र गोचर ‘या’ राशींना करणार मालामाल
वृषभ (Vrushabh Rashi)
वृषभ राशीच्या व्यक्तींना शुक्राचे नक्षत्र गोचर फायदेशीर ठरेल. अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. समाजात मान-सन्मान वाढेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. जोडीदाराला वेळ द्याल. मानसिक तणावातून मुक्त रहाल. आयुष्यात आनंदी आनंद असेल.
मीन (Meen Rashi)
मीन राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे नक्षत्र परिवर्तन अनुकूल ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.
मेष (Mesh Rashi)
मेष राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे नक्षत्र परिवर्तन खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. बँक बॅलन्समध्ये प्रचंड वाढ होईल.
सिंह (Singh Rashi)
शुक्राचे नक्षत्र परिवर्तन सिंह राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. मनातील इच्छा पूर्ण होतील.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
