Shukra Nakshatra Pada Gochar 2026: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते. पंचांगानुसार, दैत्यगुरू शुक्र १६ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी ४ वाजून ४४ मिनिटांनी शततारका नक्षत्राच्या द्वितीय पदातून तृतीय पदामध्ये गोचर करेल. शुक्राचे हे नक्षत्र गोचर नक्कीच खूप लाभदायक ठरेल.

शुक्राचे नक्षत्र गोचर ‘या’ राशींना मालामाल करणार

वृषभ (Vrushabh Rashi)

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे शततारका नक्षत्र पद गोचर खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा.

कर्क (Kark Rashi)

शुक्राचे नक्षत्र पद गोचर कर्क व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. या काळात भाग्याची साथ मिळेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर सहज मात कराल.

मीन (Meen Rashi)

मीन राशीच्या व्यक्तींसाठी शततारका नक्षत्र पद गोचर अनुकूल ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.

कुंभ (Kumbha Rashi)

शुक्राचे नक्षत्र पद परिवर्तन कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)