Malavya Rajyog 2024: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी राशी बदल करत असतात, ज्यामुळे शुभ आणि राजयोग निर्माण होतात. यात संपत्ती आणि समृद्धी देणारा शुक्र १९ मे रोजी स्वतःच्या राशीत म्हणजे वृषभ राशीत प्रवेश करेल. शुक्र सुमारे एक वर्षानंतर वृषभ राशीत प्रवेश करेल. शुक्राच्या राशी संक्रमणामुळे मालव्य राजयोग तयार होईल, यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते. तसेच या लोकांच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. पण, या तीन भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊ…

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी मालव्य राजयोगाची निर्मिती फायदेशीर ठरू शकते. यामुळे तुमच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडू शकतो. व्यवसायात अनेक पटीने नफा होऊ शकतो, यामुळे तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. तसेच वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण येतील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. त्याच वेळी तुम्हाला करिअरशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. या काळात तुमची आर्थिक स्थितीही खूप मजबूत होऊ शकते.

vaishakh amavasya 2024
Vaishakh Amavasya 2024 : वैशाख अमावस्येच्या दिवशी शुभ संयोग, ‘या’ पाच राशींवर होणार देवी लक्ष्‍मीची कृपा
loksatta analysis severe warming in indian cities
विश्लेषण : शहरांमधील तापमानवाढ किती गंभीर? 
mother along with nine brokers arrested for attempts to sell three month old baby for Rs 1 5 lakh
दीड लाख रुपयांसाठी तीन महिन्यांच्या बाळाच्या विक्रीचा आईकडून प्रयत्न – बाळाच्या आईसह नऊ दलाल अटकेत
Will you be rich before the end of 2024
२०२४ संपण्यापूर्वी तुम्हीही होणार श्रीमंत? शनि देवाच्या कृपेने ‘हा’ मूलांक असणाऱ्या व्यक्तींच्या दारी येणार लक्ष्मी
10th Board Exam Topper Heer Ghetiya Dies
१० वीला ९९.७० टक्के मिळवणाऱ्या हीरचा निकालानंतर चार दिवसातच मृत्यू; वडिलांचा निर्णय वाचून मन हळहळेल
Hajj pilgrims, app, devotees,
हज यात्रेकरूंच्या समस्या निवारणासाठी ॲपची निर्मिती; नव्या उपक्रमाने भाविकांना दिलासा
Benefits Of Shevgyachi Bhaji Moringa Leaves powder
शेवग्याच्या शेंगा व भाजीमध्ये दडलेले फायदे वाचा, एका दिवसात किती व कसा खावा शेवगा? तज्ज्ञांनी सांगितलं कॅलरीजचं सूत्र
200 Years Later Shani Jayanti 2024 Nakshtra Gochar
चौफेर धनवर्षाव होणार! २०० वर्षांनी शनी जयंतीला ‘हा’ दुर्मिळ योगायोग; तीन राशींच्या कुंडलीत ‘या’ रूपात वसेल लक्ष्मी

सिंह

वृषभ राशीतील शुक्राचं संक्रमण तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते. या काळात तुम्हाला तुमच्या नोकरीत नवीन संधी मिळतील आणि जे नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत त्यांना फायदा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना वेतनवाढ आणि पदोन्नती मिळू शकते. यावेळी तुम्ही पैशांची बचत करण्यात यशस्वी व्हाल. तसेच तुमच्या लव्ह लाईफमध्ये या काळात तुमच्या जोडीदाराबरोबरचे तुमचे नाते खूप मैत्रीपूर्ण असेल आणि तुमच्या नात्याची ताकद वाढेल. यासह तुमच्या वडिलांसोबत तुमचे नाते अधिक घट्ट होईल.

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी मालव्य राजयोग फलदायी ठरू शकतो. या काळात तुम्ही भाग्यवान होऊ शकता. तसेच आर्थिक बाबतीतही तुमची स्थिती खूप मजबूत असेल. यावेळी तुम्ही देश-विदेशातही प्रवास करू शकता. तसेच शुक्राचे संक्रमण तुमच्या जीवनात भौतिक सुख आणि सुविधा वाढवणारे मानले जाते. तुम्हाला तुमच्या व्यवसायात नवीन ऑर्डर मिळू शकतात आणि तुम्हाला कमाईसाठी चांगल्या संधी मिळू शकतात. यावेळी स्पर्धात्मक विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेत यश मिळू शकते.