Shukra-Rahu Nakshatra Gochar 2026: ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते. तर राहूला मायावी ग्रह म्हटले जाते. राहू इतर ग्रहांप्रमाणेच आपले राशी परिवर्तन करतो. ज्यामुळे या ग्रहांच्या बदलाचा चांगला-वाईट परिणाम सर्व राशींवर होतो. या ग्रहाची एखाद्यावर शुभ दृष्टी असल्यास त्या व्यक्तीचे भाग्य उजळते. तसेच अशुभ दृष्टी असल्यास व्यक्तीला आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. दरम्यान, सध्या राहू कुंभ राशीत विराजमान असून फेब्रुवारीत शुक्र ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.
पंचांगानुसार, ०६ फेब्रुवारी २०२६ रोजी शुक्र मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. हे राशी परिवर्तन रात्री ०१ वाजून १५ मिनिटांनी होईल. या राशीत आधीपासूनच राहू उपस्थित असल्याने या राशीत शुक्र आणि राहूची युती निर्माण होईल. ही युती नक्कीच काही राशींच्या लोकांसाठी अनुकूल ठरेल.
राहू ‘या’ राशींचे नशीब चमकवणार
मेष (Mesh Rashi)
मेष राशीच्या व्यक्तींसाठी राहूचे परिवर्तन खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा.
वृश्चिक (Vruschik Rashi)
वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी ही युती अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची आणि सहकाऱ्यांचीही मदत प्राप्त होईल, पगारवाढ होईल. घरात शुभ कार्ये होतील. वैवाहिक आयुष्यदेखील सुखमय असेल. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत.
तूळ (Tula Rashi)
तूळ राशीच्या व्यक्तींसाठी राहूचे परिवर्तन अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल.
कुंभ (Kumbha Rashi)
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी राहूच्या परिवर्तनाचे अनेक लाभकारी परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबातील वाद मिटतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. नोकरी-व्यवसायात पदोन्नती होईल. आकस्मिक धनलाभ होईल. कुटुंबातील जुने वाद मिटतील, आनंदाचे वातावरण असेल. कामच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. अडकलेले पैसे परत मिळतील.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

