Shukra Rashi And Nakshatra Gochar 2026: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते. पंचांगानुसार, दैत्यगुरू शुक्र २६ मार्च २०२६ रोजी पहाटे ०५ वाजून १३ मिनिटांनी मंगळ ग्रहाच्या मेष राशीत प्रवेश करणार आहे. तसेच याच दिवशी तो अश्विनी नक्षत्रामध्ये देखील प्रवेश करेल. अश्विनी नक्षत्राचा स्वामी ग्रह केतू असून मंगळच्या राशीतील आणि केतूच्या नक्षत्रातील शुक्राचा प्रवेश काहा राशींसाठी अत्यंत लाभदायक ठरेल.
शुक्राचे डबल गोचर होणार ‘या’ राशींचे भाग्य उजळणार
तूळ (Tula Rashi)
तूळ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे राशी आणि नक्षत्र परिवर्तन खूप अनुकूल ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. करिअरमध्ये उच्च पद प्राप्त कराल. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.
वृषभ (Vrushabh Rashi)
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे राशी आणि नक्षत्र परिवर्तन खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा.
सिंह (Singh Rashi)
सिंह राशीच्या लोकांसाठी शुक्राचे राशी आणि नक्षत्र गोचर अत्यंत सकारात्मक सिद्ध होईल. या काळात तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होतील. मनापासून प्रत्येक कामात सहभागी व्हाल. आयुष्यात आनंदी आनंद निर्माण होईल. या काळात तुम्हाला अनेक सुख, सुविधा प्राप्त होतील. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मनासारखे यश मिळेल. स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्यांनाही उत्तम यश मिळवता येईल. भाग्याची पुरेपुर साथ मिळेल. बँक बॅलन्स वाढेल. कष्टाचे योग्य फळ मिळेल. प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील.
कुंभ (Kumbha Rashi)
शुक्राचे नक्षत्र परिवर्तन कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

