scorecardresearch

१५ फेब्रुवारी ते १२ मार्च दरम्यान ‘या’ राशींना मिळू शकतो प्रचंड पैसा; होऊ शकतात अपार श्रीमंत

Venus Planet Transit In Meen: धन आणि वैभव देणारा शुक्र मीन राशीत १५ फेब्रुवारीला प्रवेश करणार आहे आणि १२ मार्च पर्यंत तो मीन राशीत विराजमान राहील. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसेल.

shukra transit 2023
फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम

Venus Planet Transit In Meen: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी त्यांच्या नीच आणि उच्च राशीत प्रवेश करतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि देश-विश्वावर होतो. धन आणि वैभव देणारा शुक्र मीन राशीत १५ फेब्रुवारीला प्रवेश करणार आहे आणि १२ मार्च पर्यंत तो मीन राशीत विराजमान राहील. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसेल. परंतु अशा ३ राशी आहेत ज्यांच्यासाठी शुक्राचे संक्रमण फायदेशीर सिद्ध होऊ शकते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

मिथुन राशी

शुक्र मीन राशीत प्रवेश करतात मालव्य राज योग तयार करतील. ज्याचा परिणाम मिथुन राशींच्या लोकांवर दिसून येईल. यावेळी तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तसेच जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला वेतन वाढ होऊ शकते. याशिवाय व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काय शुभ असेल. त्याचप्रमाणे यावेळी तुम्हाला कुटुंबाची चांगली साथ मिळेल. ज्यामुळे रखडलेली कामे देखील पूर्ण होतील.

कन्या राशी

शुक्र प्रवेशाने मालव्य राजयोग तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. यावेळी तुम्ही परदेशी यात्रा करू शकता. तसेच तुम्हाला या काळात जोडीदाराची चांगली साथ मिळेल ज्यामुळे तुमची रखडलेली अनेक कामे मार्गी लागतील. तसेच जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर याकाळात चांगला फायदा होईल. याकाळात तुम्ही एखादे वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. तसेच तुम्हाला या काळात मित्राची चांगली साथ मिळेल.

( हे ही वाचा: ‘लक्ष्मी योग’ बनल्याने ‘या’ राशींचे भाग्य चमकणार; २०२३ वर्षभर मिळणार बक्कळ धनलाभाची संधी)

धनु राशी

शुक्र प्रवेशाने मालव्य राजयोग तयार झाल्याने धनु राशीसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. या काळात तुम्ही एखादे वाहन किंवा जागा खरेदी करू शकता. याशिवाय तुम्हाला या काळात अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती देखील सुधारेल. नोकरी करणाऱ्यांसाठी या काळात वेतन वाढ होऊ शकते. तसंच तुम्ही या काळात कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 20:04 IST