scorecardresearch

लक्ष्मी कृपेने ‘या’ राशींमध्ये धन राजयोग बनल्याने होणार बक्कळ धनलाभ? ‘या’ रुपात पैसे व प्रेम मिळू शकते

Dhan Rajyog: वैदिक ज्योतिष अभ्यासक सांगतात की, जेव्हा शुक्र ग्रह कोणत्याही राशीत पहिल्या, चौथ्या, सातव्या, किंवा दहाव्या स्थानी प्रवेश घेतो तेव्हा धन राजयोग निर्माण होऊ शकतो.

Shukra Transit Creates Dhan Rajyog Lakshmi Can Make These Zodiac Signs Wealthy More Money Name Astrology News
लक्ष्मी कृपेने 'या' राशींमध्ये धन राजयोग बनल्याने होणार बक्कळ धनलाभ? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Shukra Transit Dhan Yog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाच्या राशी व नक्षत्र परिवर्तनाला विशेष महत्त्व असते. त्यामुळे १२ राशींच्या भविष्यातील प्राप्ती व कर्मावर प्रभाव पडू शकतो. मे महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच १० मे २०२३ ला शुक्रदेव कर्क राशीत प्रवेश घेतला होता सध्या शुक्रदेव हे ज्या स्थितीतून भ्रमण यामुळे कर्क राशीत धन राजयोग तयार होत आहे. विशेष म्हणजे हा राजयोग ७ जुलै २०२३ ला सकाळी ३ वाजून ५९ मिनिटांपर्यंत कायम असणार आहे. यामुळे येत्या दोन महिन्यात काही राशींना बक्कळ लाभाचे योग तयार होत आहेत.

धन राजयोग कसा तयार होतो?

वैदिक ज्योतिष अभ्यासक सांगतात की, जेव्हा शुक्र ग्रह कोणत्याही राशीत पहिल्या, चौथ्या, सातव्या, किंवा दहाव्या स्थानी प्रवेश घेतो तेव्हा धन राजयोग निर्माण होऊ शकतो. अशावेळी जर शुक्र तूळ,सिंह किंवा कर्क राशीत असेल त्याचा लाभ द्विगुणित होऊ शकतो. सध्या श्युकर्देवं कर्क राशीत पहिल्याच स्थानी असल्याने हा धन राजयोग तयार होत आहे. व याचे महत्त्व हे अत्यंत खास आहे.

धन राजयोग बनल्याने ‘या’ राशी होतील श्रीमंत?

मिथुन रास (Gemini Zodiac)

मिथुन ही बुधदेवाची रास मानली जाते. बुध व शुक्र यांच्यात मैत्रीपूर्ण भाव असल्याने येत्या काळात जेव्हा शुक्रदेव अधिक कार्यशाली होतील तेव्हा त्यांचा शुभ प्रभाव हा मिथुन राशीवर सुद्धा पडू शकतो. मिथुन राशीचं विशेषतः द्वितीय स्थानी शुक्राचा कृपाशिर्वाद कायम असणार आहे. येत्या काळात तुम्हाला कौटुंबिक सुख प्राप्त होऊ शकते. यासह आपल्या भाग्यात शुक्राच्या रूपात प्रेमाचा सुद्धा अंश येणार आहे. विवाहासाठी अनुरूप स्थळे चालून येऊ शकतात शिवाय कुटुंबातही एखादा लग्नाचा प्रसंग योजला जाऊ शकतो. तुम्हाला खर्च रुपी गुंतवणूक करता येऊ शकते ज्यामुळे भविष्यात ओप्राचंड धनलाभ होण्याची चिन्हे दिसत आहेत.

कर्क रास (Cancer Zodiac)

अर्थात कर्क राशीत पहिल्याच स्थानी शुक्रदेव प्रभावी असल्याने येत्या काळात या राशीसाठी विलासी जीवनाचा अनुभव देणारी एखादी घटना घडू शकते. माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला प्रत्येक सुरु केलेल्या कामामध्ये यश प्राप्त होऊ शकते तसेच चैनीच्या वस्तूंमध्ये तुम्हाला धन गुंतवता येऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमचा मान-सन्मान वाढीस लागू शकते. याचा अर्थ असाही होऊ शकतो की आपल्याला लवकरच पदोन्नती व पगारवाढीचा योग आहे. तुम्हाला शक्य होईल तितके वाणीवर नियंत्रण ठेवा विनाकारण निंदा- नालस्तीचा भाग होऊ नका.

हे ही वाचा<< बुध – सूर्य – शनीदेव मोठ्या उलाढालीला तयार; जूनमध्ये ‘या’ ३ राशींना कोट्याधीश बनून मिळणार अच्छे दिन?

कन्या रास (Virgo Zodiac)

कन्या राशीला धन राजयोग अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतो. कन्या राशीच्या गोचर कुंडलीत ११ व्या स्थानी शुक्राचा प्रभाव तगडा असल्याने लाभाचे संकेत आहेत. सर्वात शुभ प्रभाव हा तुमच्या वैवाहिक व प्रेमाच्या नात्यांवर पडण्याची शक्यता आहे. तुमच्या कुटुंबात एखाद्या नव्या माणसाचा प्रवेश होऊ शकतो ज्यारुपात प्रचंड धनसंपत्ती व लाभ वाट्याला येऊ शकतो. तसेच कुटुंबात एक वेगळाच आणा दव उत्साह संचारला जाऊ शकतो. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची साथ मिळू शकते जेणेकरून तुम्हाला हितशत्रूंवर मात करता येऊ शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-05-2023 at 17:27 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या